-
Who is Shubhanshu Shukla: भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आज (२५ जून) दुपारी १२.०१ वाजता इतिहास रचला आहे. शुभांशू शुक्ला यांनी नासाच्या (अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था) फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘ॲक्सिऑम-४’ या अंतराळ मोहीमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केलं आहे. नासाचं फॉल्कन-९ हे यान अवकाशात झेपावलं आणि त्याबरोबर शुक्ला यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. राकेश शर्मा यांच्यानंतर अतराळ मोहिमेवर जाणारे शुभांशू शुक्ला हे दुसरे भारतीय ठरले आहेत. (Photo: X)
-
त्यांची ही मोहिम १४ दिवसांची असणार आहे. यामध्ये स्पेसएक्सच्या अॅक्सियम ४ मिशन अंतर्गत ४ देशांना अंतराळात जाण्याची संधी मिळाली आहे. (Photo: X)
-
काय आहे अॅक्सियम ४ मिशन?
सहभागी सदस्य
कमांडर पेही व्हिटसन अमेरिका, पायलट शुभांशू शुक्ला भारत, मिशन स्पेशलिस्ट सॉवॉस उझनॅन्स्की पोलंड, तिबोर कपूर हंगेरी (Photo: X) -
कोण आहेत शुभांशू शुक्ला?
शुभांशू शुक्ला यांचा जन्म १० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनौमध्ये झाला. (Photo: X) -
एनडीए आणि आयएएफमधून त्यांनी लष्करी शिक्षण घेतलं. (Photo: X)
-
बंगळुरूतून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एम टेक केले. २००६ मध्ये वायूदलामध्ये लढाऊ पायलट म्हणून रूजू (Photo: X)
-
MIG-21, mIG 29, Su-30 Jaguar Hawk ही विमाने चालवली (Photo: X)
-
सुमारे २ हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव, २०१९ मध्य्ये ISRO च्या गगनयान कार्यक्रमासाठी निवड (Photo: X)
-
रशियामध्ये युरी गगारिन प्रशिक्षण केंद्रात वैज्ञानिक प्रशिक्षण (Photo: X)
-
‘ॲक्सिऑम-४’ मिशनचे मुख्य पायलट, ४१ वर्षांनंतर ISS वर प्रवास करणारे पहिले भारतीय (Photo: X) हेही पाहा- Photos : इराणचं नागरिकत्व सोडून स्पेनला स्थायिक होणाऱ्या सुंदर बुद्धिबळपटूची संघर्षमय गोष्ट…
Who is Shubhanshu Shukla: कोण आहेत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला? शिक्षण ते विविध विमानांची उड्डाणं; कसा आहे आतापर्यंतचा प्रवास?
Astronaut Shubhanshu Shukla : राकेश शर्मा यांच्यानंतर अतराळ मोहिमेवर जाणारे शुभांशू शुक्ला हे दुसरे भारतीय ठरले आहेत.
Web Title: Who is shubhanshu shukla education to flying various aircraft indian astronaut know about his journey spl