-
Happy Birthday Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस आहे.
-
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार (Rajya Sabha MP Sunetra Pawar) यांनी खास शुभेच्छा (Birthday Wishes) दिल्या आहेत.
-
सुनेत्रा पवार यांची पोस्ट.. “नेतृत्व जे कृतीतून सिद्ध होतं..! राजकारण, प्रशासन आणि लोकसेवा या तिन्ही क्षेत्रांमधील आदरणीय अजितदादांच्या सशक्त वाटचालीस मी पत्नी म्हणून कायमच जवळून पाहत आले आहे. तुमचं नेतृत्व संकटात मार्ग दाखवतं, निर्णयांतून दिशा ठरवतं आणि माणसांशी असलेली नाळ जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवून देतं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!”
-
सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पत्र (Birthday Special Letter) लिहिले आहे.
-
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती विधानसभा मतदारसंघातील आमदार (Baramati Assembly Constituency MLA) आहेत.
-
अजित पवार हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि वेगाने केलेल्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत.
-
अजित पवार हे असे राजकारणी आहेत जे व्यक्तिगत आयुष्याबद्दल फारसे व्यक्त होत नाहीत.
-
अजित पवार यांच्याबरोबर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis Happy Birthday) यांचादेखील वाढदिवस आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुनेत्रा पवार/इन्स्टाग्राम)
Photos: ‘मी पत्नी म्हणून कायमच…’; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवार यांनी दिल्या खास शुभेच्छा
अजित पवार हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि वेगाने केलेल्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत.
Web Title: Maharashtra dcm ajit pawar happy birthday wife mp sunetra pawar special post letter viral sdn