• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. eknath khadse son in law pranjal khewalkarlimousine car controversy anjali damania rohini khadse spl

प्रांजल खेवलकरांच्या लिमोझिन कारच्या वादामध्ये एकनाथ खडसेंनी दिलेला जावयाला पाठिंबा; काय होतं ते प्रकरण?

Pranjal khewalkar rave party: एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

Updated: July 28, 2025 13:30 IST
Follow Us
  • Rohini Khadse Husband Pranjal Khevalkar arrested in rave party
    1/10

    Pranjal khewalkar : सध्या राज्यामध्ये एक प्रकरण जोरदार गाजत आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जावयांची अटक. (फोटो: प्रांजल खेवलकर/ इन्स्टाग्राम)

  • 2/10

    एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी (Rave Party) केल्याप्रकरणी अटक (Arrest) करण्यात आली. (फोटो: प्रांजल खेवलकर/ इन्स्टाग्राम)

  • 3/10

    रोहिणी खडसे यांच्या हडपसर (hadapsar) इथल्या बंगल्यावरही छापा टाकण्यात आल्याने या प्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने टाकलेल्या या छाप्यात कोकेन, (Cocaine) गांजा (Cannabis) यासह इतर अमली पदार्थही (Other drugs) जप्त करण्यात आले आहेत. (फोटो: प्रांजल खेवलकर/ इन्स्टाग्राम)

  • 4/10

    प्रांजल खेवलकर यांच्यासह या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा (Two Woman) सहभाग आहे. (फोटो: प्रांजल खेवलकर/ इन्स्टाग्राम)

  • 5/10

    दरम्यान, खडसेंचे जावई प्रांजल हे याआधीही सोनाटा लिमोझिन (limousine) या कारमुळे वादात सापडले आहेत. ते प्रकरण नेमकं काय होतं हे आज आपण जाणून घेऊयात. (फोटो: प्रांजल खेवलकर/ इन्स्टाग्राम)

  • 6/10

    काय होतं लिमोझिन कार प्रकरण?
     कारची चुकीची नोंदणी झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला होता. प्रांजल यांच्याकडील एमएच १९ एक्यू ७८०० ही सोनाटा लिमोझिन कार (Sonata limousine Car) अवैध असल्याचा दावा त्यांनी केला होता. (प्रतिकात्मक फोटो, Credit: Meta AI)

  • 7/10

    हलक्या वाहनांच्या श्रेणीमध्ये या मोठ्या आकाराच्या कारची नोंदणी करण्यात आली होती. याव्यतिरिक्त, अॅम्बेसिडर लिमोझिन कारव्यतिरिक्त अन्य लिमोझिन कार्सना देशात परवानगी नसल्याचा दावाही दमानिया यांनी केला होता. दरम्यान, लिमोझिनीवरून एकनाथ खडसेंना आरोपांच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागल्याचे पाहायला मिळाले होते. (फोटो: प्रांजल खेवलकर/ इन्स्टाग्राम)

  • 8/10

    लिमोझिन कारबाबत खडसेनी दिलेलं स्पष्टीकरण
    ज्या कारवरून अंजली दमानिया यांनी आरोप केले होते, त्याबाबत खडसेंनी स्पष्टीकरण दिलं होत ते म्हणाले होते, “ज्या कारबद्दल वाद चालू आहे, त्या कारची मूळ मालकाकडून खरेदी २००८ मध्ये केली होती, त्यानंतर ती प्रांजल खेवलकर यांनी २०१२ मध्ये खरेदी केली. मात्र माझ्या मुलीचं लग्न २०१३ मध्ये झालं, त्यामुळे कार खरेदी प्रकरण वादाचं कसं? त्याबाबत दमानियांनी पुरावे दिले पाहिजेत”, असं आव्हान खडसेंनी दिलं दमानियांना दिलं होतं. (फोटो: प्रांजल खेवलकर/ इन्स्टाग्राम)

  • 9/10

    प्रांजल यांच्या अटकेवर रोहिणी खडसे व एकनाथ खडसे यांच्या प्रतिक्रिया
    “कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल! जय महाराष्ट्र”, असं एका पोस्टमध्ये रोहिणी खडसेंनी म्हटलं आहे. (फोटो: प्रांजल खेवलकर/ इन्स्टाग्राम)

  • 10/10

    पोलीस यंत्रणेने खरोखर चांगल्या पद्धतीने तपास करायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी असे होते की, पोलीस यंत्रणा तपास व्यवस्थित करत नाही. अशी जनमानसामध्ये प्रतिमा आहे. जर या प्रकरणामध्ये तथ्य असेल तर जावई असो किंवा कुणीही असो त्याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु जर जाणूनबुजून अडकविण्याचा प्रयत्न केला असेल तर तेही सहन केले जाणार नाही.” ( (फोटो: लोकसत्ता संग्रहित) हेही पाहा- 10 Most powerful Army: जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांच्या यादीमध्ये भारतीय सैन्य कितव्या स्थानी?

TOPICS
एकनाथ खडसेEknath Khadseट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग टॉपिकTrending Topicमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPolitics

Web Title: Eknath khadse son in law pranjal khewalkarlimousine car controversy anjali damania rohini khadse spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.