अमेठी आणि रायबरेली या प्रसिद्ध लोकसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत, मात्र काँग्रेसच्या उमेदवारांबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोन जागांवरून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा होती. मात्र, प्रियंका गांधी निवडणूक लढवणार नसल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने मिळाले आहे. त्या फक्त प्रचार करणार आहेत. त्यामुळे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत. गांधी परिवारातील एकाने हिंदीबहुल मतदारसंघातून निवडणूक न लढवल्यास एक वाईट राजकीय संदेश जाईल आणि म्हणून त्यांच्यापैकी एक नक्कीच निवडणूक लढवेल, असंही नेतृत्वाच्या एका मोठ्या वर्गाचा असा विश्वास आहे. उमेदवारी ३ मेपर्यंत दाखल करता येणार आहे. दोन्ही मतदारसंघात २० मे रोजी मतदान होईल.

अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून गांधी कुटुंबातील सदस्याचे नाव जाहीर न केल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आजपासून गौरीगंज येथील मध्यवर्ती कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. पक्ष अमेठी आणि रायबरेलीमधील उमेदवार निश्चित करण्याच्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच नावांची घोषणा केली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास काँग्रेसमधून निवडणुकीच्या राजकारणात उतरणाऱ्या नेहरू-गांधी कुटुंबातील त्या आठव्या सदस्या असतील. त्यांनी निवडणूक लढवली तर गांधी घराण्यातील तीन सदस्य संसदेत पोहोचणार आहेत. राहुल गांधी यांची आई आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी नुकत्याच राज्यसभा सदस्य झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा यांनी अलीकडेच पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) बैठकीत राहुल गांधींना अमेठीतून आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याची विनंती केली होती, यावर कोणताही निर्णय झालेला नसला तरी लढा अद्याप सुरू आहे.

२६ एप्रिलपासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार

मिळालेल्या माहितीनुसार, २६ एप्रिलपासून अमेठी आणि रायबरेलीमध्ये नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून, ती ३ मेपर्यंत चालणार आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. भाजपाने पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीतून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. स्मृती यांनी २९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. भाजपाने अद्याप रायबरेलीमधून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

राहुल-प्रियंका यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह

उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटी आणि अमेठी आणि रायबरेलीच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी अलीकडेच नेतृत्वाला विनंती केली होती, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या जागांवरून निवडणूक लढवावी, असे त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावेळी रायबरेलीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्या राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. त्यांनी दोन दशके रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास काँग्रेसमधून निवडणुकीच्या राजकारणात उतरणाऱ्या नेहरू-गांधी कुटुंबातील त्या आठव्या सदस्या असतील. त्यांनी निवडणूक लढवली तर गांधी घराण्यातील तीन सदस्य संसदेत पोहोचणार आहेत. राहुल गांधी यांची आई आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी नुकत्याच राज्यसभा सदस्य झाल्या आहेत. कुटुंबातील तीन सदस्य संसदेत पोहोचल्यास तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा हे घराणेशाहीच्या राजकारणावरून विरोधी इंडिया आघाडीतील नेत्यांवर हल्ला करीत आहेत.

राहुल आणि प्रियंका या दोघांनीही निवडणूक लढवल्यास भाजापची घराणेशाहीची टीका अधिक तीव्र होऊ शकते. राहुल गांधी यांना भेडसावणारा दुसरा प्रश्न म्हणजे अमेठी आणि वायनाड या दोन्ही जागा जिंकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांना एक जागा निवडून दुसरी सोडावी लागेल, ज्या जागेनं त्यांना २००४ मध्ये पहिल्यांदा संसदेत पाठवले होते. त्यांनी मतदारसंघाचे तीनदा प्रतिनिधित्व केले आणि दुसऱ्यांदा ते २०१९ मध्ये खासदार राहतील, याची खात्री केली.

हेही वाचाः सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या नातवासाठी देवेगौडांनी सोडला होता मतदारसंघ; कुटुंबात राजकीय दुफळी

इंदिरा गांधींनी १९७८ मध्ये चिक्कमगलुरूमधून कदाचित त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची निवडणूक जिंकली होती. परंतु त्यांनी १९८० मध्ये मेडक आणि रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही जिंकल्यानंतर त्यांनी रायबरेली सोडली. सोनिया गांधींनी १९९९ मध्ये बेल्लारी आणि अमेठी या दोन्हीमधून निवडणूक जिंकल्या होत्या, पण त्यानंतर त्यांनी बेल्लारी मतदारसंघ सोडला,” असेही एका नेत्याने सांगितले. प्रियंका नाही तर राहुल गांधी यांची मनधरणी करण्याची पक्षाला आशा असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रियंकाने विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध अमेठीतून निवडणूक लढवावी आणि राहुल गांधी यांनी रायबरेलीला जावे, असे पक्षाच्या एका वर्गाचे मत आहे.

“प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. अमेठी आणि रायबरेलीही त्याला अपवाद नाहीत. आम्हाला तेथे चांगल्या उमेदवारांची गरज आहे, ” असेही एका नेत्याने सांगितले. १९९९ पासून काँग्रेस अमेठी आणि रायबरेली जिंकत होती, परंतु २०१९ मध्ये त्यांना मोठा धक्का बसला, जेव्हा २००४ ते २०१४ दरम्यान अमेठीची जागा तीनदा जिंकलेल्या राहुल गांधी यांना ५५ हजारांहून अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला. सोनिया २००४ पासून या जागेवरून विजयी होत होत्या.

हेही वाचाः ठाण्यात भाजप, नाईकांना रोखण्यात मुख्यमंत्री यशस्वी

गांधी कुटुंबाचा अमेठी आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी दीर्घकाळ संबंध आहे. फिरोज गांधी यांनी १९५२ आणि १९५७ मध्ये रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले होते. इंदिरा यांनी १९६४ मध्ये राज्यसभेच्या सदस्या म्हणून संसदेत प्रवेश केला असला तरी त्यांचे लोकसभेत पदार्पण १९६७ मध्ये रायबरेली येथून झाले होते. १९७७ च्या निवडणुकीत राज नारायण यांच्याकडून पराभूत होण्यापूर्वी त्यांनी १९७१ मध्ये पुन्हा विजय मिळवला होता. १९८० मध्ये इंदिरा गांधींनी अविभाजित आंध्र प्रदेशातील रायबरेली आणि मेडक येथून निवडणूक लढवली, दोन्ही जिंकले आणि मेडक जागा राखणे निवडले.

१९८० मध्ये संजय गांधींनी त्यांच्या निवडणूक पदार्पणातच या जागेवरून संसदेत प्रवेश केला, तेव्हापासून अमेठीशी कुटुंबाचा संबंध सुरू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर राजीव यांनी १९८१ मध्ये अमेठीमधून निवडणुकीत पदार्पण केले आणि १९९१ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत ते या जागेवरून खासदार होते. १९९१ मध्ये सोनिया गांधींचे निवडणूक पदार्पणदेखील अमेठीमधून होते. २००४ मध्ये त्या रायबरेली येथे राहण्यास आल्या, ज्यामुळे त्यांचा मुलगा राहुल गांधी यांच्यासाठी मतदारसंघातून निवडणुकीत पदार्पण करण्याचा मार्ग तयार झाला.

राहुल गांधी २००४ ते २०१९ पर्यंत अमेठीचे खासदार होते

राहुल गांधी २००४ ते २०१९ या काळात अमेठीतून लोकसभा सदस्य होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. नुकतेच गाझियाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांना अमेठीतून निवडणूक लढविण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हा निर्णय पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत घेतला जाईल आणि पक्षाकडून जो काही आदेश येईल, तो स्वीकारू. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत, जिथे शुक्रवारी मतदान संपले.