पुणे : राज्यातील पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर प्रदेश, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशांसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे ७५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग एक भरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे: बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून

राज्य मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला. आता विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर प्रदेश, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी दहावीच्या निकालापूर्वीच अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार २५ मेपासून नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ७५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर पुढील दोन दिवस नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. तर निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येईल, तसेच महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येतील. प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 75 thousand students registered online for centralised admission process for class 11 pune print news ccp 14 zws