लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: येरवडा कारागृहात पुन्हा कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारागृहातील वर्चस्वातून कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली होती.

या प्रकरणी प्रकाश विठ्ठल रेणुसे, विकास बाळासाहेब कांबळे, वैभव थिटे, तेजस बाळासाहेब बच्छाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारागृह रक्षक कृष्णा वानोळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्र व्यापला

येरवडा कारागृहातील सीजे विभागात पाण्याच्या हौदाजवळ कैदी रेणुसे, कांबळे, थिटे, बच्छाव यांचा सुजीत टाक याच्याशी वाद झाला. या कारणावरुन रेणुसे, कांबळे, थिटे, बच्छाव यांनी टाक याला शिवीगाळ करुन त्याला प्लास्टिकच्या बादलीने मारहाण केली. मारहाणीत टाक जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.

हेही वाचा… पंकजा मुंडे या भाजपच्या जेष्ठ नेत्या, त्या कुठेही जाणार नाहीत- रावसाहेब दानवे

येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. कारागृहाची क्षमता अडीच हजार कैदी एवढी आहे. प्रत्यक्षात कारागृहात सात हजार कैदी आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आल्याने कारागृहात कैद्यांमध्ये वाद होऊन हाणामारीच्या घटना घडतात. कारागृहातील वर्चस्वातून कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी १६ कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against four prisoners due to a fight between prisoners in yerawada jail in pune print news rbk 25 dvr