पुणे : पुणे आणि पिंपरी- चिंचवडसह आजूबाजूच्या परिसरात सीएनजीच्या दरात गुरुवारी मध्यरात्रीपासून प्रतिकिलो दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सीएनजी दर आता प्रतिकिलो ८७.९० रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, पाईप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पुणे, पिंपरी-चिचवडसह चाकण, तळेगाव हिंजवडमध्ये सीएनजीचा पुरवठा केला जातो. कंपनीने गुरुवारी मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दोन रुपये वाढ केली. यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो ८७.९० रुपयांवर गेला आहे. याआधी गणेशोत्सवात ८ सप्टेंबरला सीएनजीच्या दरात प्रतिकिलो ९० पैसे वाढ झाली होती. यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो ८५.९० रुपयांवर गेला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचा दर वाढल्याने त्याची आयात महागली आहे. यामुळे कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचे पाऊल उचलले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतही वाढत आहे. यामुळे सीएनजीच्या दरात स्थानिक पातळीवर वाढ झाली असून, ही वाढ २ रुपये प्रतिकिलो आहे. सीएनजीचा दर आता प्रतिकिलो ८७.९० रुपये झाला असला तरी त्यातून पुण्यातील मोटारचालकांची पेट्रोलच्या तुलनेत ४९ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत २७ टक्के बचत होत असून रिक्षाचालकांची २९ टक्के बचत होत आहे, असे कंपनीने सप्टेबरमधील दरवाढीवेळी म्हटले होते .

हे ही वाचा… ‘मावळ पॅटर्न’ यशस्वी होणार का?

यावर्षी जुलै महिन्यातही सीएनजीचे दर वाढले होते. सध्या इंधनाचे दर वाढले असून पेट्रोल आणि डिझेल महागल्याने वाहनचालक पर्यावरणपूरक सीएनजीला पसंती देत आहेत. मात्र, आता सीएनजीचे दरही वाढू लागले आहेत. पुण्यात जुलैमध्ये सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सीएनजीचा दर त्यावेळी प्रतिकिलो ८५ रुपयांवर पोहोचला होता. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनाचालकांच्या खिशाला झळ बसत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After election voting in pune pimpri chinchwad cng price hiked know the changed rate in cities pune print news stj 05 asj