Premium

पक्षातील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच अजितदादांच्या बालेकिल्यात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

भटक्या विमुक्तांच्या व्यथा, वेदना जाणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केल्याने भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठान संघाच्या वतीने शरद पवार यांना मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

Sharad Pawar pimpri chinchwad
पक्षातील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच अजितदादांच्या बालेकिल्यात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पिंपरी : पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे महिला कार्यकर्त्यांनी जेसीबीतून पुष्पवृष्टी करत मोठ्या उत्साहात स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भटक्या विमुक्तांच्या व्यथा, वेदना जाणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केल्याने भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठान संघाच्या वतीने शरद पवार यांना मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी पवार दापोडीत आले आहेत. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. दापोडी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, काशिनाथ नखाते, देवेंद्र तायडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा – पिंपरी : महापालिकेच्या ४१ हजार मालमत्ताकर थकबाकीदारांना नोटिसा, होणार ‘ही’ कारवाई

हेही वाचा – पुणे : कामगारांच्या प्रश्नी सुनील शेळके आक्रमक; म्हणाले, एक काय चार कंपन्या बंद पडल्या…

भाजपासोबत सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी-चिंचवड शहराकडे पाहिले जाते. पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शहरात लक्ष घातले आहे. आमदार रोहित पवार यांच्याकडे शहराची जबाबदारी दिली आहे. ते सातत्याने शहरात येत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शहर दौरा केला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार शहरात आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After the split in the party sharad pawar for the first time in pimpri chinchwad pune print news ggy 03 ssb

First published on: 02-10-2023 at 17:07 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा