मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, त्यांना वेगळं आरक्षण द्यावं, अशी भूमिका भुजबळांनी घेतली. तसेच त्यांनी अंबड येथील सभेतून मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी छगन भुजबळांच्या वक्तव्यापासून अंतर राखलं आणि ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया दिली. यावर आता स्वत: अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “होय, पंकजा मुंडेंवर अन्याय झालाय”; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, “ज्यांच्या वडिलांनी…”

मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांची भूमिका वैयक्तिक आहे, या सुनील तटकरेंच्या विधानाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “त्याबाबतीत आम्ही ३० आणि १ तारखेला कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबीर आयोजित केलं आहे. तिथे मी माझी भूमिका मांडेन. परंतु माझं स्पष्ट मत आहे की, सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील किंवा राजकारणाशी संबंध नसणारे असतील, प्रत्येकाने थोडी सावध भूमिका घेतली पाहिजे. कोणत्याही समाजात तेढ निर्माण होणार नाही किंवा अंतर निर्माण होणार नाही, याबाबतची खबरदारी घेणं ही काळाची गरज आहे.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reaction on chhagan bhujbal stand about maratha reservation rmm