लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात महायुतीमधील अनेक नेते प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात होती.त्याच दरम्यान कागल येथील भाजपचे नेते समरजीत घाडगे, इंदापूर येथील भाजपचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसापूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केला.या दोन नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर,येत्या काळात महायुतीमधील आणखी नेतेमंडळी शरद पवार गटात येण्याच्या मार्गावर बोलले जात असताना.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘बारामती’साठी शरद पवारांची नवी खेळी? इच्छुकांच्या मुलाखतीसाठी युगेंद्र पवार आलेच नाहीत

पुण्यातील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे माजी संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची चर्चा पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.या चर्चे बाबत भाजपचे नेते माजी खासदार संजय काकडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,मी मागील दहा वर्षात पक्षासाठी माझ्यापरीने योगदान दिले आहे.मात्र माझ्या कामाची दखल घेतली गेली नाही.माझा केवळ वापर करून घेण्यात आला आहे.भाजपमधील एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>> शाळांमध्ये चित्रपट, लघुपट दाखवायचाय? शिक्षण विभागाकडून धोरण निश्चित…

याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे.मी दसऱ्यानंतर प्रवेश करणार आहे.तसेच मी औपचारिकता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माझा निर्णय सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय काकडे यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.पण संजय काकडे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.त्या भेटीत देवेंद्र फडणवीस हे संजय काकडे यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mp sanjay kakade to leave bjp will join sharad pawar ncp svk 88 zws