पुणे : विदर्भात उष्णतेच्या लाटा येऊ शकतात, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात मंगळवारी सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून तापमानवाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यवतमान, वाशिम, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांत काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, मोसमी वारे अद्याप तळकोकणातच आहे. राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर हलक्या पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टीवर २३ आणि २४ जून रोजी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भातील तापमान
अकोला : ४०.२ अमरावरती : ४०
चंद्रपूर : ४२.२ गडचिरोली : ४१.२
गोंदिया : ४१.४ नागपूर : ४१.४