पिंपरी : काही लोक गेले असले तरी नाउमेद होऊ नका, मतदार जागेवरच आहे. शरद पवार यांच्याबद्दल समाजात प्रचंड सहानभूती आहे. पवार यांचे नाव, तपश्चर्या असून त्याचा निवडणुकीत फायदा होईल असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातून खासदार डाॅ. अमोल कोल्हे हेच निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भोसरी विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पाटील बोलत होते. शहराध्यक्ष तुषार कामठे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, काशिनाथ नखाते, देवेंद्र तायडे, प्रवक्ते माधव पाटील यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : पिंपरी : छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुतळ्यांच्या जागेत बदल; पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड?

पाटील म्हणाले की, आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी बूथ कमिट्या सक्षम करा. बूथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपणच आपली फसवणूक करून घेतो, असा त्याचा अर्थ होतो. गर्दी जमणे, माणसे गोळा होणे, हे महत्वाचे असून निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहचणारे सैन्य नसेल तर पक्षाच्या प्रचाराला तळागळापर्यंत पोहचविण्याची क्षमता कमी होते. शिरूर लोकसभा मतदार संघातून डाॅ. कोल्हे उभे राहणार आहेत. शरद पवार यांच्याबद्दल समाजात प्रचंड सहानभूती आहे. त्याचा कोल्हे यांना फायदा होणार आहे.

हेही वाचा : पिंपरी : विकासकामांसाठी कर्ज काढणारी पिंपरी महापालिका मेट्रो मार्गिकेखाली लावणार कोट्यवधींचे दिवे

परीक्षा जवळ आली असून संघटनेच्या कामाला गती द्यावी. नशीबाने जेवढे लोक मते देतील, असे राजकारण आम्ही कधी केले नाही. शरद पवार यांचे नाव, तपश्चर्या आहे, हे सगळे खरे असले तरी जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरात जावून पेट्रोल, गॅस महागला हे सांगावे. ४६४ बूथ गुणिले चार हजार ६४० माणसे झाली तर शरद पवार यांची भोसरी विधानसभेत जाहीर सभा घेण्यात येईल. गटबाजी, एकमेकांचा मत्सर वाढायला लागला आहे. गटबाजी संपविली पाहिजे. पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्याच्या पाठिशी रहावे, सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे, असेही पाटील म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri jayant patil of ncp sharad pawar faction declared their first lok sabha canditate amol kolhe pune print news ggy 03 css
First published on: 09-02-2024 at 14:07 IST