पिंपरी : अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने आणीबाणी लावली. राज्य घटनेच्या धज्जिया उडविल्या. अनेकदा स्वार्थासाठी घटनेत बदल केला. जनता पार्टीच्या सरकारने १९७७ मध्ये काँग्रेसने माेडताेड केलेल्या दुरूस्त्या रद्द केल्या. ज्यांनी राज्यघटना ताेडण्याचे पाप केले, तेच लाेक आता हातात घटना घेऊन जहरी आणि खाेटा प्रचार करत असल्याची टीका केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. भाजप राज्यघटना कधीच बदलणार नाही, काेणाला बदलूही देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंचवडचे भाजप उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ वाकड येथील आयाेजित सभेत गडकरी बाेलत हाेते. आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, अमित गाेरखे यावेळी उपस्थित हाेते. लाेकसभा निवडणुकीदरम्यान जातीवाद आणि सांप्रदियकतेचे जहर कालविण्यात आले. भाजप राज्यघटना बदलणार असा खाेटा प्रचार विरोधकांनी केला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना भाजप कधीच बदलणार नाही आणि काेणाला बदलूही देणार नाही, असे सांगून गडकरी म्हणाले, काँग्रेसने २०, ४०, ८, ५ कलमी अशा खूप कार्यक्रमाच्या घाेषणा दिल्या.

हेही वाचा : ‘मावळ पॅटर्न’चे काय होणार?

f

गरिबी हटवचा नारा दिला मात्र, दलित, मुस्लीम, शेतमजूर, शेतकरी यांची गरिबी हटली नाही. केवळ काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते, चेलेचपाटे, चमच्यांची गरिबी हटली. सामान्य माणसांची हटली नाही. ७५ वर्षात ६० वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचे राज्य हाेते. काँग्रेसच्या चुकीच्या धाेरणामुळे देशाचे नुकसान झाले. देशाचे भवितव्य बदलण्यासाठी याेग्य निती, नेतृव,पक्षाची निवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले. देशात पैशांची कमी नाही, देशासाठी प्रामाणिकपणे काम करणा-या नेत्यांची कमी आहे. जगात सर्वाधिक हुशार आणि युवा अभियंते आपल्या भारतात आहेत. त्यामुळे आपला देशात विश्वगुरू हाेण्याची क्षमता आहे.

हेही वाचा : Sanjay Raut: १७ तारखेला शिवतीर्थावर सांगता सभा होणार – खासदार संजय राऊत

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ८० हजार काेटी रूपयांचे उड्डाणपुल

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक काेंडीचा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. पुण्यात ८० हजार काेटी रूपयांचे उड्डाणपुल बांधण्यास मान्यता दिल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune bjp nitin gadkari said bjp never change constitution of india also not allow anyone to change it pune print news ggy 03 css