पुणे: आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही, असा टोला लगावत खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवाजीराव आढळराव पाटील यांना नव्हे तर, छगन भुजबळांना शिरुर मधून उमेदवारी देण्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट महाविकास आघाडीचे उमेदवार कोल्हे यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे: घरफोडीचे १५० गुन्हे दाखल असलेल्या ‘जयड्या’ गजाआड

त्यानंतर आज आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले. त्यावरून कोल्हे यांनी डमी उमेदवार म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आलेच नाहीत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मी काय सभा घेणार नाही. मी फक्त रोड शो करून जाईल, अस नागपूरकर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावरूनच स्पष्ट होतं आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune mp amol kolhe said shivajirao adhalarao patil is dummy candidate for shirur lok sabha kjp 91 css