पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदारांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थन केलं, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजित दादा यांनी समर्थन केलं. ते सरकारचे अविभाज्य भाग आहेत. मी स्वतः त्याठिकाणी लोकसभेत होते. आम्ही लोकसभेत घोषणा दिलेल्या नव्हत्या. जर त्या माणसाच्या हातात बॉम्ब असता तर त्या दिवशी सर्व खासदारांचा कार्यक्रमच झाला असता. एखादा माणूस उडी मारून येतो, या देशाची सुरक्षेची जबाबदारी कोणाची? कांद्याला भाव आम्ही मागितला तसेच संसदेवरील हल्ला झालेल्या प्रश्नावर आम्ही बोललो. आता संसदेत नक्की काय झालं याची माहिती दादांना नसेल”, असेही त्यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सुप्रिया सुळे घेणार अजित पवारांची भेट, ‘हे’ आहे कारण

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती लोकसभा जागेवर उमेदवार देणार आहेत, असा प्रश्न खासदार सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर राज्यात लोकशाही आहे, दिल्लीत दडपशाही आहे, असे उत्तर त्यांनी दिले. शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे यांच्याशी दिल्लीत चर्चा झाली आहे. येत्या १५ दिवसांत जागा वाटपा संदर्भात माहिती मिळेल, असेही त्यांनी माध्यमांना सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune ncp leader supriya sule statement on suspension of mps of lok sabha and rajya sabha svk 88 css