पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांच्याबरोबर असणारे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे सोमवारी अजित पवार यांच्याबरोबर व्यासपीठावर दिसून आले. त्यामुळे ते नेमके कोणत्या गटात, अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महिन्यांपूर्वी फूट पडली. अजित पवार त्यांच्या काही समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर अजित पवार यांना शहर आणि जिल्ह्यातील अनेक आमदार, पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला. त्यावेळी हडपसरचे आमदार तुपे यांनी तटस्थ भूमिका घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे: मोकाट श्वानांच्या लसीकरण,नसबंदी मोहिमेत अडथळा; महापालिकेकडून कारवाईचा इशारा

त्यानंतर शरद पवार यांच्या मुंबई येथील सभेलाही ते उपस्थित होते. शरद पवार यांच्याबरोबर राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, सोमवारी अजित पवार यांच्यासमवेत व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने तुपे कोणत्या गटात, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हडपसरमध्ये नियोजित कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला तुपेही उपस्थित होते. अजित पवार यांच्याशेजारीच व्यासपीठावर ते बसल्याचे दिसून आले. त्यामुळे ते कोणत्या गटाचे? याची चर्चा पुन्हा सुरू झाली. दरम्यान, तुपे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune sharad pawar faction ncp mla chetan tupe appeared on stage with ajit pawar pune print news apk 13 css