लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: धनकवडी भागातील तळजाई पठार परिसरात मध्यरात्री टोळक्याने दहशत माजविली. टोळक्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या २० ते २५ वाहनांची तोडफोड केली.

या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी मध्यरात्री वारजे भागातील कॅनल रस्त्यावर टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. मंगळवारी (२० जून) मध्यरात्री तळजाई पठार परिसरात टोळक्याने शिवीगाळ करुन दहशत माजविली. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. टोळक्याने दांडक्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या रिक्षा, मोटारी, दुचाकी, टेम्पोच्या काचा फोडल्या. या भागातील २० ते २५ वाहनांची तोडफोड केली.

हेही वाचा… इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांची आयआयटी मुंबईला ३१५ कोटींची देणगी

तळजाई वसाहत परिसरात मोठ्या संख्येने कष्टकरी राहायला आहेत. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याचा प्रकार आल्यानंतर या भागातील रहिवाशांनी तोडफोड करणाऱ्या आरोपींना पकडण्याची मागणी केली. पाच वर्षांपूर्वी या भागातील ३० ते ४० वाहनांची तोडफोड करुन जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In taljai pathar area goons created terror and vandalized vehicles pune print news rbk 25 dvr