लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी: आम्ही कोयता गँगची माणसे असून धंदा करायचा असेल तर २०० रुपयांच्या हप्त्याची मागणी करत चौघांनी फळ विक्रेत्याला धमकी दिली. तसेच आळंदीचा बाप ज्ञानेश्वर बडगे आहे असेही आरोपींनी म्हटले. ही घटना आळंदीतील योगीराज चौकात घडली.

याप्रकरणी शामा विटकर, ज्ञानेश्वर बडगे, राकेश काळे, अजय देवरस (सर्व रा. पद्मावती झोपडपट्टी, आळंदी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोहम पद्माकर काळे (वय २३, रा. पसायदाननगर, आळंदी) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… पुणेकरांना समान पाणी देण्यासाठी सल्ल्यांवर सल्ले!….करोडो रुपये पाण्यात!

फिर्यादी सोहम याचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. त्याची आरोपींशी तोंड ओळख आहे. आरोपी सोहम याच्या दुकानावर आले. आरोपी अजय याने आम्ही कोयता गँगची माणसे आहोत. आळंदीचा बाप ज्ञानेश्वर बडगे असल्याचे म्हटले. तर, आरोपी शामा याने ‘तुला येथे धंदा करायचा असेल. तर, आम्हाला रोजचा २०० रुपये हप्ता दे’ नाही तर दुकान तोडून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार ननावरे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koyta gang terror by demanding ransom from fruit seller in alandi pimpri pune print news ggy 03 dvr