आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मधील भाजपने तीन दिवसापूर्वी ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये शहरातील कोथरूडमधून चंद्रकांत पाटील,पर्वती विधानसभा मतदार संघामधून माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून सिद्धार्थ शिरोळे या तीन विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली होती.मात्र पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे आणि खडकवासला मतदार संघाचे भीमराव तापकीर विद्यमान आमदारांच्या नावाची घोषणा झाली नाही. त्यामुळे त्या दोन्ही आमदाराचे टेंशन वाढले आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली नाही.तर दुसर्या बाजूला महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या देखील जागावाटपा बाबत बैठका सुरू आहेत.उद्या सायंकाळपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपा बाबत चित्र स्पष्ट होईल,असे बोलले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा