Mumbai Breaking News Updates : मुंबईत सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका सोमवारी दुपारी ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ला बसला. आझाद नगर मेट्रो स्थानकाजवळील एका बांधकाम प्रकल्पावरील एक प्लास्टिक शीट उडून ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील ओव्हरहेड इलेक्ट्रीकल लाईनवर पडली. त्यामुळे मेट्रो सेवा बंद पडली होती. तर आता मेट्रो सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून देण्यात आली. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असून यात अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सदर दुर्घटना घडली असल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री उशीरा चार जणांचा मृतदेह आढळून आला. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 16 June 2025
ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचा प्रवेशाेत्सव, माधान्य भोजनामध्ये शिरा देऊन विद्यार्थ्यांचे तोंड गोड
‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात भाजप नेत्यांच्या सहभागाने खळबळ; एकाला अटक तर अन्य…
मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांंना बॉम्बस्फोट घडवण्याचा ई – मेल
Mumbai Best Bus Pothole : गिरगावातील मेट्रो ३ स्थानकालगतचा रस्ता खचला, खचलेल्या खड्ड्यात बस अडकली
मेट्रो ३ मार्गिकेवरील गिरगाव स्थानकाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेड्सच्या अगदी जवळून बस जात असतानाच रस्ता खचला.
Mumbai Best Bus Pothole : गिरगावातील मेट्रो ३ स्थानकालगतचा रस्ता खचला, खचलेल्या खड्ड्यात बस अडकली
पावसामुळे रेल्वे प्रवाशांना विलंबयातना
मुंबईत २४ तासांत मुसळधार पाऊस; ‘या’ भागात सर्वाधिक पावसाची नोंद, राज्यातही पावासाचा जोर कायम
उपराजधानीत मध्यरात्री घरात सर्पदर्शन, सर्पमित्र आला धाऊन
उपराजधानीतील सिरसपेठ परिसरातील एका नागरिकाच्या घरी ऐन मध्यरात्रीच्या सुमारास साप आढळून आला.
मोठया गणेशमूर्ती विसर्जनाबाबत ३० जूनपर्यंत भूमिका मांडणार; सांस्कृतीक मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आश्वासन
नागपूर : प्रेमाचा त्रिकोण, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याची हत्या
वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित…हद्दीतील बारमध्ये ४० मुली नाचताना आढळल्या
Mumbai Rain News: मुंबईत पावसाची संततधार सुरूच; पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता…
Video : लोणावळा पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; भुशी धरण ओव्हरफ्लो
लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण्याच्या पायऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला… हजारो स्कूल बसची योग्यता तपासणी थांबली..
रत्नागिरी : वस्तीत शिरलेला बिबट्या विहिरीत पडला; वन विभागाला बिबट्याला वाचविण्यात यश
चिपळूण तालुक्यातील तनाळी राधाकृष्णवाडी येथे वस्तीत शिरलेला बिबट्या एका घराच्या मागे असलेल्या विहीरीत पडला.
Monsoon Updates: मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पोषक वातावरण
मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. रविवारी पहाटेही काही भागांत पावसाचा जोर कायम होता.
पुणे कुंडमळा पूल दुर्घटना लाईव्ह न्यूज अपडेट्स