पुणे : मामाच्या घरी शिक्षणासाठी आलेल्या अनाथ अल्पवयीन मुलीला धमकावून एकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. गेल्या पाच वर्षांपासून अल्पवयीन मुलीला धमकावून आरोपी बलात्कार करत असल्याचे उघडकीस आले आहे. रघुनाथ बोरकर (वय ५१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा >>> पिंपरी: उद्योगनगरीत चार दिवसांत तीन खून

याबाबत एका युवतीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोरकरविरुद्ध बलात्कार, बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यातील कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार युवती अनाथ आहे. ती अल्पवयीन होती. तेव्हा मामाच्या घरी शिक्षणासाठी आली होती. सप्टेंबर २०१८ ते जून २०२३ या कालावधीत बोरकरने तिला वेळोवेळी धमकावून बलात्कार केला. ती अनाथ असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. अखेर तिने बोरकरविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.