पिंपरी : शहर पोलीस दलात शिपाई पदाच्या २६२ जागांसाठी भरती केली जाणार आहे. ५ ते ३१ मार्च २०२०४ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती policerecruitment२०२४.mahait.org आणि http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस भरतीमध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी ७९, महिला ७८, खेळाडू १५, प्रकल्पग्रस्त १४, भूकंपग्रस्त चार, माजी सैनिक ४१, अंशकालीन पदवीधर ११, पोलीस पाल्य सात, गृहरक्षक दल १३ जागा असणार आहेत. उमेदवारांना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवार राज्यभरात एका घटकातच अर्ज करू शकतो. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यामध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. ४० टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तांची कारवाई : ‘मेफेड्रोन’ प्रकरणात सापडलेला पोलीस उपनिरीक्षक निलंबित; दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

शारीरिक आणि लेखी चाचणी मधील गुणांच्या आधारे उमेदवारांची एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी केली जाईल. कागदपत्र पडताळणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार केली जाईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. पोलीस भरतीच्या अर्जासाठी खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ३५० रुपये शुल्क भरावे लागेल. उमेदवार दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. १८ ते २८ वर्ष वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police recruitment at pimpri chinchwad police commissioner office for 262 posts pune print news ggy 03 css