पिंपरी : ४४ किलो ७९० ग्रॅम किलो वजनाचे ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपयांचे मेफेड्रोन अमली पदार्थासह अटक केलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. तर, दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.

पिंपळेनिलख रक्षक चौकात हॉटेल कामगाराकडून दोन कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त केल्यानंतर या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक करण्यात आली आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन कोठून आणले याची विचारणा पोलिसांनी केल्यावर नमामीने निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक शेळके याचे नाव घेतले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. शेळके याचा सहभाग आढळल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
indusInd bank officials arrested
बनावट शेअर ट्रेडिंग घोटाळा: इंडसइंड बँकेच्या अधिकाऱ्यांना अटक; सायबर पोलीस ठाण्याची कारवाई

हेही वाचा : पिंपरी चिंचवडमध्ये पाणीटंचाई : ‘हे’ आहे कारण

देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका महाविद्यालयीन तरुणाला गांजा जवळ बाळगल्याच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून कारागृहात टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून पाच लाखांची खंडणी उकळली. या प्रकरणातील पोलीस कर्मचारी हेमंत गायकवाड आणि सचिन शेजळ यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.