ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी पटकथा लेखन केलेल्या चित्रपटांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (११ सप्टेंबर) आणि शनिवारी (१२ सप्टेंबर) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात हा महोत्सव होणार आहे. तेंडुलकरांच्या साहित्यकृतींचे विश्लेषण करणाऱ्या ‘अ-जून तेंडुलकर’ या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ते’ मराठी नाटक पाहिलं आणि कुणीतरी तोंडात मारल्यानं खुर्चीखाली पडल्यासारखं वाटलं : जावेद अख्तर

आशय फिल्म क्लब, साहित्य संस्कृती रंगभूमी प्रतिष्ठान आणि राजहंस प्रकाशनाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. याबाबत आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी रेखा इनामदार साने, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, प्रतिष्ठानचे अशोक कुलकर्णी उपस्थित होते. याच महोत्सवामध्ये तेंडुलकरांच्या साहित्यकृतींचे विश्लेषण करणाऱ्या ‘अ-जून तेंडुलकर’ या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकरही उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात तेंडुलकरांचे पटकथा लेखन असलेले मित्रा, आघात आणि सरदार हे चित्रपट पाहता येणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Publication of a joon tendulkar