पुणे शहरातील कोथरूड भागातील इंद्रधनु सोसायटीमधील केदार सोमण नावाच्या व्यक्तीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली. त्या प्रकरणी मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस हे कार्यकर्त्यांसह केदार सोमण यांच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले होते. त्याच वेळी पोलिसदेखील घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना सोसायटी बाहेर काढले. त्यानंतर केदार सोमण यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जात असताना मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
याबाबत मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस म्हणाले की, सोशल मीडियावर केदार सोमण या नावाच्या व्यक्तीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याची बाब समोर आली. त्यानंतर आम्ही या व्यक्तीचा शोध घेतल्यावर सुरुवातीला तो ठाणे येथील असल्याचे समजले, पण त्यानंतर पुण्यातील कोथरूड भागात राहण्यास असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणी आम्ही केदार सोमण या नावाच्या व्यक्तीला चोप देण्यासाठी आलो होतो. मात्र, पोलिस आल्याने तो वाचला असून आम्ही त्या व्यक्तीला सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
केदार सोमण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यामध्ये ते नेमकं काय म्हणाले होते पाहूया
रात्री हाल्फ खंबा मारून झाल्यावर राज कायम उद्धवला फोन करून म्हणायचा, तू_मेरा_भाई_है
(उठा रात्री, पण घरीच बसून वाईन प्यायचा, घराबाहेर न पाडण्याचे व्रत अखंड होते)