Mumbai Pune Nagpur News Updates 13 May 2025 :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९४.१० टक्के लागला. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही घट झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १.७१ टक्क्यांनी घटला आहे. त्यात कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.८२ टक्के, तर सर्वांत कमी नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के निकाल लागला आहे.

तसेच, मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात आज (मंगळवारी) विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार,पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.

या बातम्यांसह मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 13 May 2025

12:16 (IST) 13 May 2025

आमदार परिणय फुकेंच्या घरातील वाद पुन्हा चव्हाट्यावर; सासूच्या तक्रारीवरून सुनेविरुद्ध गुन्हा

प्रिया फुके यांच्या तक्रारीवरुन डॉ. रमा फुके यांच्या घरातील नोकर चिंटू गजभिये याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे आमदार परिणय फुकेंच्या घरातील कौटुंबिक वाद पोलीस ठाण्यात पोहचल्यामुळे चव्हाट्यावर आला आहे. …सविस्तर वाचा
12:06 (IST) 13 May 2025

गुंतवणूकदारांना चार कोटींना गंडा… उघडला ढाबा… सात महिन्यांपासून फरार आरोपीला बेड्या

पोलिसांनी ग्राहक बनून ढाब्यातच सापळा रचला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली. …सविस्तर वाचा
11:24 (IST) 13 May 2025

पुण्यात लोक अदालतीत एका दिवसात ८६ हजार दावे निकाली

अनेक दावे तडजोडीत निकाली काढता येत असल्याने विधी सेवा प्राधिकरणाकडून नियमित लोक अदलात या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते …सविस्तर वाचा
11:08 (IST) 13 May 2025

ताडोबात दोन वाघांची जोरदार झुंज; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

अधिवास आणि वाघिणीवरील हक्काच्या लढाईतून दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली. या झुंजीत एक वाघ मृत्युमुखी पडला, तर एक वाघ गंभीर जखमी झाला. …वाचा सविस्तर
10:39 (IST) 13 May 2025

भारत-पाक तणाव… मुंबईत बॉम्बस्फोट ? ई-मेल येताच सायबर पोलिसांचे तपास सत्र सुरू

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या तीन दिवसात बॉम्बस्फोट होणार असल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. …अधिक वाचा
10:17 (IST) 13 May 2025

वाळू माफियांचा हैदोस; नागपूर ग्रामीणमध्ये सव्वादोन वर्षांत…

बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, नागपूरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वाळू माफियांचे प्राबल्य वाढले आहे. …वाचा सविस्तर
10:06 (IST) 13 May 2025

बुधवार आणि गुरुवारी विदर्भाला “ऑरेंज अलर्ट”

विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून येत्या बुधवार आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी “ऑरेंज अलर्ट” दिला आहे. …अधिक वाचा
09:12 (IST) 13 May 2025

मुंबईत वादळी पावसाचा इशारा… हवामान विभागाने आज दिला ‘यलो अलर्ट’…

मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात आज (मंगळवारी) विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. …अधिक वाचा

मुंबई पुणे नागपूर  ब्रेकिंग न्यूज टुडे