पुणे: जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली.या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज जालना येथील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.तर त्यावेळी शरद पवार यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर भाजपच्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याच दरम्यान भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पुणे दौर्‍यावर होते.त्यावेळी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.हा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारताच ते म्हणाले की,भाजपचे नेते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार शरद पवार यांना नाही.भाजप सरकारच्या काळात मराठा आरक्षण टिकविण्याच काम देवेंद्र फडणवीस यांनी केले.पण शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी एक तरी प्रयत्न केला का ? हे स्वतः शरद पवार यांनी सांगावे.कायम आरक्षणा विरोधात त्यांनी भूमिका मांडली आहे.ही बाब सर्वांनी माहिती आहे.तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्या ऐवजी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते.त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण घालवले. तेव्हा उद्धव ठाकरे यांचा राजीनामा का मागितला नाही. अशा शब्दात शरद पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

हेही वाचा >>>मराठा समाजाच्या वतीने दिघीमध्ये निदर्शने

तसेच ते पुढे म्हणाले की,जालना येथे मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन करण्यासाठी नागरिक बसले होते.त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाला.त्या संदर्भात राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.त्यामधून वस्तुस्थिती समोर येणार आहे.त्या घटनेच कोणीही समर्थन करीत नाही.पण राज्यातील मराठा समाजाने शांत राहण्याचे आवाहन करीत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात ५८ मोर्चे काढण्यात आले.त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते.त्यावेळी त्यांनी मागास आयोगाची स्थापना केली होती आणि सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका मांडली होती.त्यामुळे मराठा समाजाला आम्ही आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याची भूमिका देखील यावेळी त्यांनी मांडली.

हेही वाचा >>>शाळेची बनावट तुकडी दाखवून शासकीय अनुदान लाटण्याचा प्रयत्न; तत्कालीन उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा

उद्धव ठाकरे यांनी थोड तारतम्य बाळगण्याची गरज

संसदेच्या अधिवेशनात वटहुकूम काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.त्या प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,उद्धव ठाकरे यांनी थोड तारतम्य बाळगण्याची गरज असून तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री होता.त्यावेळी तुम्ही काय दिवे लावले.हे आम्हाला समजू द्या,तुम्ही सरकारी वकीलास कागदपत्र दिली आणि फी देखील दिली नाही. त्यामुळे समाज बांधवांना एकच सांगू इच्छितो की, हे बोलघेवडे लोक तुमचा प्रश्न सोडविण्यापेक्षा अधिक पेटवत ठेवतील आणि राजकीय हित जोपासण्याच करतील अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrishna vikhe patil opined that sharad pawar has no moral right to demand the resignation of devendra fadnavis svk 88 amy