राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सर्वच स्तरावरून त्यांच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना आज पुणे दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखववण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईवरून संभाजीराजे छत्रपती यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संविधानिक मार्गाने निषेध केला तरी, पोलीस कारवाई करतात, हा कुठला न्याय? असे ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – VIDEO: राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, शिवी देत म्हणाले, “*** तू यापुढे…”

“स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून ‘स्वराज्य’च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा, हा कोणता न्याय आहे? कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत?” असा प्रश्न संभाजी राजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे.

“आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अवमान करून कोश्यारी हे उघड माथ्याने राज्यात फिरतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संविधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलीस कारवाई करतात”, असेही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji raje chhatrapati reaction after police arrest cc in pune spb