पुणे : मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊ महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना स्वारगेट भागात घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बलात्काराच्या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने राजस्थानात जाऊन पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा स्वारगेट पोलिसांकडे तपासासाठी सोपविण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

सोहेल सबीक खान (वय २०), कालू आबन खान (वय ५०, दोघे मूळ रा. चामडीयाक, जि. पाली, राजस्थान), दिलदार खाजू खान (वय २७, मूळ रा. हापत, जि. जोधपूर, राजस्थान) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत महिला एका वसाहतीत राहायला होती. ती आणि तिचा पती कामानिमित्त पुण्यात आले होते. वसाहतीत चुलत सासऱ्यांच्या घराजवळ भाड्याने खोली घेऊन पीडित महिला राहायला होती. जून महिन्यात आरोपी सोहेल महिलेच्या घरी आला. तिला धमकावून त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती कोणाला दिल्यास मुलांना जिवे मारू, अशी धमकी त्याने दिले. त्यानंतर महिला चुलत सासऱ्यांच्या घरी गेली. तेव्हा तिसऱ्या मजल्यावर असलेल्या टाकीतील पाण्याची पातळी पाहण्यासाठी ती गेली.

हेही वाचा >>> मोटारीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच; सहायक फौजदारासह, वॉर्डनवर गुन्हा

तेव्हा आरोपी कालू आणि सोहेल यांनी तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकाराची कोणाला माहिती दिल्यास समाजात बदनामी करू, अशी धमकी त्यांनी दिली. या घटनेनंतर घाबरलेली महिला मूळगावी राजस्थानाला गेली. प्रवासात आरोपी दिलरदारने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. या घटनेची पोलिसांना माहिती देऊ नको, अशी धमकी दिली. पीडीत महिला राजस्थानात पोहचल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर तेथील पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पोलिसांकडे तपासासाठी सोपविला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children pune print news rbk 25 zws