पुणे: यंदाची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक महात्मा फुले मंडई येथून मानाचा पहिला कसबा गणपतीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी साडे नऊ वाजता पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.ढोल ताशाच्या गजरत आणि पारंपरिक खेळ मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचे पाहण्यास मिळाले.सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी मिरवणुकीला सुरवात झाली.तर ३ वाजून ४५ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.तर या मिरवणुकीमध्ये मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती.ही पाहण्यास पुणेकर नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणुक पालखीमधून काढण्यात आली.सतीश आढाव यांचे नगारा वादन,न्यू गंधर्व ब्रास बँड, ढोल-ताशा पथकांचे सुरेख असे वादन करण्यात आले.तर ४ वाजून ३५ मिनिटांनी विसर्जन झाले.
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाची अश्वराज ब्रास बँड,अतुल बेहरे यांचे नादब्रह्म ढोल ताशा पथक,नादब्रह्म ट्रस्ट ढोल ताशा पथक,गर्जना ढोल ताशा पथक तसेच स्वप्निल आणि सुभाष सरपाले यांनी बनविलेल्या हरहर महादेव या फुलांच्या आकर्षक रथातुन मिरवणूक काढण्यात आली.तर ४ वाजून ३५ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे यंदाचे १२५ वे व्या वर्ष असून गणेशोत्सवाची सांगता मिरवणुक मयूर रथातून काढण्यात आली.या रथावर फुलांची आकर्षक सजावटी करण्यात आली होती. हायड्रोलीक पद्धतीचा वापर करण्यात आला होता.या रथाची उंची ३५ फूट इतकी होती.तर रथ १६ फूट रुंद आणि २४ फूट लांब होता.यावेळी ढोल ताशा पथकांनी सुरेख असे वादन करून पुणेकर नागरिकांची मन जिंकली.तर ५ वाजून ७ मिनीटांनी विसर्जन करण्यात आले.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची मिरवणुक महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.इतिहास प्रेमी मंडळाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी जिर्णोद्धारचा देखावा साकारण्यात आला होता.कथकली मुखवटयाच्या रथात गणरायाची पालखी विराजमान करण्यात आली होती.तर श्रीराम,शिवमुद्रा स्वराज्य ट्रस्ट या तीन ढोल ताशा पथकांनी सुरेख असे वादन केले.तर ५ वाजून ४० मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.