पिंपरी-चिंचवड: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी- चिंचवड शहराची ओळख आहे. याच पिंपरी- चिंचवड शहरात आता राष्ट्रवादीची दोन कार्यालये झाली आहेत. याआधी पिंपरी- चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाने नव्याने पक्ष कार्यालय उभारलं असून काही दिवसांमध्येच त्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अशी माहिती शरद पवार गटाचे युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं बघायला मिळत आहे. पिंपरी- चिंचवड शहर हे अजित पवार यांनी केलेल्या विकासामुळे ओळखले जाते. याच शहरामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन कार्यलये झाली आहेत. एकीकडे आधीच पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे आता शरद पवार राष्ट्रवादी गटाला दुसरे पक्ष कार्यालय थाटावे लागले आहे. हे पक्ष कार्यालय काळेवाडी येथे सुरू करण्यात आलं असून लवकरच त्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी माहिती दिली आहे.

आणखी वाचा-देशाचे नाव भारत हेच राहिले पाहिजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

मुळात दोन पक्ष कार्यालये होत असल्याने आम्हाला देखील दुःख होत आहे. अजित पवार यांनी बंड केल्यामुळे ही वेळ आल्याचं इम्रान शेख यांनी म्हटलं आहे. पिंपरी-चिंचवड आणि आयटी हब असलेल्या हिंजवडीचा विकास हा शरद पवार यांनी केल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलं आहे. तसेच शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येतील असा विश्वास देखील युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी व्यक्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two party offices of ncp in pimpri chinchwad sharad pawar groups office will be inaugurated soon kjp 91 mrj