Various organizations have decided to shut down Pune on December 13 to protest against the Governors controversial statement about chatrapati shivaji maharaj | Loksatta

१३ डिसेंबरला पुणे बंद; राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ विविध संघटनांचा निर्णय

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. राज्यपालांना हटवण्यासाठी विरोधी पक्षांसह अनेक संघटनांकडून मागणी करण्यात येत आहे.

१३ डिसेंबरला पुणे बंद; राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ विविध संघटनांचा निर्णय
१३ डिसेंबरला पुणे बंद ठेवण्याचा विविध संघटनांचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे.त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील एसएसपीएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनीची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधार्थ १३ डिसेंबर रोजी पुणे बंद ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

हेही वााच- भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वय ठेवा ,‘बाळासाहेबांची शिवसेने’च्या मेळाव्यात खासदार श्रीरंग बारणे यांची सूचना

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे,संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा- पुणे : मेट्रोची भूमिगत मार्गामध्ये चाचणी यशस्वी; रेंजहिल डेपो ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानकापर्यंतचे काम पूर्ण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आजपर्यंत भाजपच्या नेत्याकडून अनेक वेळा अपमान करण्याच काम झाल आहे.त्याच दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान केले आहे.या विधानाला जवळपास महिना होत आला.तरी देखील राज्यपालांवर भाजप नेतृत्व कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही.ही निषेधार्थ बाब असून या घटनेच्या निषेधार्थ १३ डिसेंबर रोजी पुणे बंदचा निर्णय सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने एक बैठक घेतला असल्याचे संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी सांगितले. तसेच जो पर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविले जात नाही. तो पर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 17:58 IST
Next Story
भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वय ठेवा ,‘बाळासाहेबांची शिवसेने’च्या मेळाव्यात खासदार श्रीरंग बारणे यांची सूचना