पुणे : राजकीय नेत्यांनी आपापल्या राजकीय पक्षांशी एकनिष्ठ असणे आश्यक आहे. कारण, राजकारण हे समजून उमजून काम करण्याचे क्षेत्र आहे. राजकीय नेत्यांनी पक्षांतर करणे योग्य नाही. अलीकडे कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. सातत्याने पक्ष बदलणे ही लाजिरवाणी बाब आहे. पक्षबदलांमुळे जनतेचा रस संपतो, अशी भूमिका माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी बुधवारी मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनावेळी नायडू बोलत होते. लेखक प्रा. रामचरण, कर्नाटक विधानसभेचे बसवराज होराटी, यू. टी. खादेर फरीद, उत्तर प्रदेशचे सतीश महाना, मध्य प्रदेशचे गिरीश गौतम, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस या वेळी उपस्थित होते.

नायडू म्हणाले, की राजकीय कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसमोर, विद्यार्थ्यांसमोर पक्षबदलाचे, गोंधळाचे, घोषणाबाजीचे आदर्श न ठेवता, एकमेकांना योग्य सन्मान करण्याची उदाहरणे समोर ठेवावीत. राजकीय विचारधारा भिन्न असतील, दृष्टिकोन वेगळे असले, तरी संसदेच्या सभागृहात सर्वांनी देशहिताचा विचार सर्वोच्च ठेवला पहिजे. देश हा एक पक्ष मानला पाहिजे. सत्ताधारी गटाच्या अयोग्य धोरणांना, कृतींना विरोधकांनी अवश्य विरोध करावा, लोकशाहीने ती ताकद प्रत्येकाला दिली आहे. विरोधकांनी गप्प बसू नये आणि टोकाचा विरोध, हिंसाचारही करू नये. लोकशाही समाजव्यवस्थेत विरोधक जरूर असावे, पण शत्रुत्व नसावे.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय

विरोधकांनीही लोकशाहीच्या चौकटीत राहून विरोध केला पाहिजे. गदारोळ, घोषणाबाजी करून संसदेच्या कामकाजात सतत अडथळे आणणे, काम बंद पाडणे योग्य नाही. संसदेचे कामकाज सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवत संसदेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी योगदान द्यावे. वाचन करून, अभ्यास करून भाषण करावे, असेही त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venkaiah naidu say defection is shameful pune print news ccp 14 pbs