scorecardresearch

व्यंकय्या नायडू

मुप्पावरपू व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचा जन्म १ जुलै १९४९ रोजी आंध्र प्रदेशातील(Andhra Pradesh) नेल्लोर येथे झाला. नायडू हे भारताचे १३ वे आणि वर्तमान उपराष्ट्रपती आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून (ABVP)आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

ते नेल्लोरच्या व्ही. आर. कॉलेजमध्ये १९७१ साली विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडूनआले होते. २००२ ते २००४ दरम्यान ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच अटलबिहारी वाजपेयीसरकारमध्ये ते केंद्रीय ग्राम विकास मंत्री होते. ११ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांनी भारताचे उप राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

१९७८ आणि १९८३ साली सलग दोनवेळा ते नेल्लोर जिल्ह्यातील उदयगीरी मतदार संघातून आंध्र प्रदेशाच्या विधानसभेत निवडून आले होते. याशिवाय १९९८, २००४ आणि २०१० सलग तीनवेळा ते राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
Read More
National Council of MLA
आपण शत्रू नव्हे, प्रतिस्पर्धी! व्यंकय्या नायडू यांचा लोकप्रतिनिधींना सल्ला

राजकारणात कार्यरत असताना आपण केवळ एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोत, शत्रू नव्हे, हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवायला हवे.

Venkaiah Naidu
आपण केवळ प्रतिस्पर्धी, शत्रू नव्हे- वैंकय्या नायडू

लोकप्रतिनिधी या नात्याने आपले विधानसभेतील आचरण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण भावी पिढी समोरील आदर्श आहोत, असे प्रतिपादन भारताचे माजी उपराष्ट्रपती…

raghav chadha aap mp punjab venkaiah naidu send off speech rajyasabha
Video : जेव्हा ‘पहिल्या प्रेमा’वर राज्यसभेत होते चर्चा… ‘आप’च्या खासदाराच्या भाषणावर उपराष्ट्रपतींचीही मिश्किल टिप्पणी!

चर्चेवर बोलताना व्यंकय्या नायडू म्हणाले, “पहिलं प्रेम चांगलं असतं.. तेच कायम असायला हवं.. आयुष्यभर!”

pm narendra modi praises venkaiah naidu
नायडूंचे ‘वन-लाइनर’ हजरजबाबीचा नमुना! ; राज्यसभेच्या सभापतींना निरोप देताना पंतप्रधान मोदींचे कौतुकोद्गार

सभापती म्हणून त्यांनी खासदारांना मातृभाषेत बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले’, असे मोदी म्हणाले.

Venkaih Naidu
संसद अधिवेशन काळातही फौजदारी गुन्ह्यात खासदारांवर कारवाई शक्य!; व्यंकय्या नायडू यांची टिप्पणी

संसदेचे अधिवेशन सुरू असल्याचे कारण देत सदस्यांना गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अटक करण्यापासून स्वत:चा बचाव करता येणार नाही.

Two MPs were disqualified for anti-party activity by vice president venkaiah naidu
केवळ पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल दोन खासदार अपात्र, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाचेही शिक्कामोर्तब

केवळ पक्षविरोधी कारवाया केल्या वा विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर गेल्याबद्दल बिहारमधील शरद यादव आणि अली अन्वर अन्सारी या राज्यसभेच्या दोन खासदारांना…

Viral Video Is it a mask or a beard Venkaiah Naidu
Video: उपराष्ट्रपतींनी हनुवटीवर हात फिरवत खासदाराला विचारलं, “ही दाढी आहे की…”; प्रश्न ऐकून सारेच लागले हसू

राज्यसभेमधील हा खासदार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील नावाजलेला अभिनेता आहे हे सुद्धा विशेष

Shivsena, Sanjay Raut, Rajya Sabha, M Venkaiah Naidu, ED, Maharashtra Government
महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी संजय राऊतांना धमकी; म्हणाले, “मदत करा, अन्यथा माजी केंद्रीय मंत्र्यांप्रमाणे तुम्हालाही…”

विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून ईडीचा वापर; संजय राऊतांचा आरोप

Venkaiah Naidu
“भारत हा सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश, पाश्चात्य माध्यमांना हे पचत नाही”, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचा निशाणा!

भारत हा जगातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश असून पाश्चात्य माध्यमांना भारताची प्रगती बघवत नाही, अशी टीका उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली…

Loksatta, Loksatta news, loksatta newspaper, marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online, Marathi, Samachar, Marathi latest news, national news, national news in marathi, andhra pradesh, Malls, commercial spaces, display, name, Telugu, vice president, Venkaiah Naidu, Vijayawada
आंध्र प्रदेशमध्ये तेलगू भाषेतील फलक हवेत: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

मी, चंद्राबाबू नायडू किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही कोणीही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलेले नाही

संबंधित बातम्या

मराठी कथा ×