ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी यांनी शुक्रवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासमवेत भास्कर बैरीशेट्टी व शिवाई नगर, पवार नगर, येऊर, वसंत विहार येथील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. त्यांचे उध्दव ठाकरे यांनी स्वागत केले. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
प्रवेशावेळी खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ओवळा माजीवडा विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, रेखा खोपकर, संजय घाडीगावकर व ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.