Mumbai-Maharashtra Political Crisis Updates, 11 November 2022 : छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

“मुंबई-महाराष्ट्रातील भाजपाचे किमान सात मंत्री, १५ आमदार-खासदार, भाजपास अर्थपुरवठा करणारे बिल्डर्स ‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरणात आत जातील असे गुन्हे त्यांच्या नावावर आहेत, पण ‘ईडी’ स्वतःच आरोपींची निवड करते हे न्यायालयाचे म्हणणे अशावेळी सत्य ठरते,” असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने संजय राऊत यांच्या सुटकेनंतर भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला आहे.

garibi hatao, Congress announcements, Nitin Gadkari, nitin gadkari criticises congress, poor got poorer, buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election campaign, mahayuti, bjp, marathi news,
“काँग्रेसच्या घोषणेने गरिबी तर हटली नाही, गरीब आणखी गरीब झाले,” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका; म्हणाले…
stamp on Pratibha Dhanorkar name
चंद्रपूर : मतदान केंद्रावर प्रतिभा धानोरकरांच्या नावावर Cancelled चा शिक्का, काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ; नेमकं प्रकरण काय?
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
latur lok sabha marathi news, archana patil joined bjp marathi news, shivraj patil chakurkar marathi news
शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने लातूरमधील राजकीय गणिते बदलली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ बरखास्त करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून राष्ट्रीय कुस्ती महासंघाला तडाखा दिला. महासंघाने कुस्तीगीर संघ अथवा कार्यकारिणीतील सदस्यांची बाजू ऐकून न घेताच संघ बरखास्त करण्याचा घेतलेला निर्णय हा मनमानी असल्याचे ताशेरे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या एकलपीठाने आदेशात ओढले आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Live Updates

Pune-Mumbai Breaking News Live, 11 November 2022 : महाराष्ट्रातील राजकीय आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

17:58 (IST) 11 Nov 2022
त्यांना मंत्रिपदापेक्षा दूध संघ महत्त्वाचा : एकनाथ खडसे

गेल्या सात वर्षांत जिल्हा दूध संघाची झालेली प्रगती सर्वांसमोर आहे. दोन मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांनी दूध संघ निवडणुकीसाठी अर्ज भरले. त्यामुळे त्यांना मंत्रिपदापेक्षा दूध संघ महत्त्वाचा वाटतो. त्यांनी या निवडणुकीत कितीही पेट्या अथवा खोके वापरले तरी दूध संघात आम्हीच जिंकणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसेंनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा

16:56 (IST) 11 Nov 2022
मुख्यमंत्री येणार म्हणून डोंबिवलीतील रस्त्यांची ‘काँक्रीट’ रंगोटी;एमआयडीसीतील रस्ते भूमिपूजनाचा दुसऱ्यांदा घाट

खड्डे, धुळीने भरलेले रस्ते पहिले सुस्थितीत करा म्हणून गेल्या काही महिन्यांपासून नागरिक टाहो फोडत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात येणार आहे कळताच डोंबिवली एमआयडीसीतील, मुख्यमंत्री जाणार असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे जोमाने सुरू केली आहेत.

सविस्तर वाचा

16:46 (IST) 11 Nov 2022
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवलीत रविवारी किलबिल महोत्सव

बालगोपाळ, बच्चे कंपनीला एक दिवसाची मौजमज्जा, मस्ती करता यावी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने रविवारी डोंबिवलीत येथे एक दिवसाच्या किलबिल महोत्सवाचे आयोजन केले आहे. डोंबिवली पश्चिमेतील बावन्न चाळ येथील रेल्वे मैदानावर हा महोत्सव संध्याकाळी चार ते रात्रो १० वेळेत होणार आहे.

सविस्तर वाचा

16:36 (IST) 11 Nov 2022
पुणे: आदर पुनावाला यांची एक कोटीची फसवणूक; बिहारमधून चोरटे अटकेत

सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांना एक कोटी रूपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी बिहारमधून ताब्यात घेतले.राजीवकुमार शिवाजी प्रसाद, चंद्रभूषण आनंद सिंग,कन्हैया कुमार संभो महतो आणि रवींद्र कुमार हुबनाथ पटेल अशी आरोपींची नावे आहेत.

सविस्तर वाचा

16:31 (IST) 11 Nov 2022
“मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं”, आव्हाडांनी ट्विट करत सांगितला अटकेआधीचा घटनाक्रम, म्हणाले “फाशी दिली तरी…”

ठाण्यात मॉलमधील सिनेमागृहात केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री १० वाजता ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत अटकेआधीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

सविस्तर बातमी

16:30 (IST) 11 Nov 2022
जितेंद्र आव्हाडांना अटक झाल्यानंतर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “जित्याची खोड, पोलिसांचे दंडूके…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईचं भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी स्वागत केलं आहे. अत्यंत योग्य आणि स्वागतार्ह कारवाई असल्याचं त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हटलं. राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, कायद्याप्रमाणे वागावं लागेल हे आव्हाडांनी लक्षात ठेवावं अशी सल्लावजा सूचनाही त्यांनी केली.

सविस्तर बातमी

15:47 (IST) 11 Nov 2022
मुंबई: विमानतळावरील प्रिपेड टॅक्सीचा प्रवास महागला; भाडे वाढ करण्याचा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचा निर्णय

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबई विमानतळावरील काळ्या-पिवळ्या प्रिपेड टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरून प्रिपेड टॅक्सीतून सहा किलोमीटर प्रवास करण्यासाठी १२७ रुपये, तर देशांतर्गत विमानतळवरून चार किलोमीटर प्रवासासाठी ८५ रुपये मोजावे लागत होते.

सविस्तर वाचा

15:46 (IST) 11 Nov 2022
तेजस ठाकरे राजकारणात येणार का? राऊतांच्या भेटीनंतर दानवे म्हणाले, "शिवसैनिकांकडून..."

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (११ नोव्हेंबर) शिवसेना खासदार संजय राऊतांची त्यांच्या मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी पत्रकारांनी तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं अशी मागणी शिवसैनिकांकडून होत असल्याचं लक्षात आणून दिलं. तसेच तेजस ठाकरे राजकारणात येणार का? असा प्रश्न विचारला. यावर अंबादास दानवेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सविस्तर बातमी...

15:45 (IST) 11 Nov 2022
संजय राऊतांच्या भेटीनंतर अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "या भेटीत..."

शिवसेना खासदार संजय राऊत यांना १०० हून अधिक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अखेर जामीन मिळाला. त्यानंतर अनेक नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शिवसेनेचेही अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (११ नोव्हेंबर) संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीत नेमकी काय चर्चा झाली त्याची माहिती दिली.

सविस्तर बातमी...

15:45 (IST) 11 Nov 2022
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत महत्त्वाच्या राज्यांमध्ये ११ भारतीयांचा डंका, कोणाचा कोठे विजय? वाचा...

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुका तेथील रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षासाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. याच निवडणुकीत यंदा डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवारीवर अनेक भारतीयवंशाचे अमेरिकन नागरिक निवडून आले आहेत. विजय उमेदवारांमध्ये एकूण ११ भारतीयवंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे.

सविस्तर बातमी...

15:29 (IST) 11 Nov 2022
ठाणे: शिंदे गटाला आणखी एक धक्का; माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी शिवबंधनात

ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी यांनी शुक्रवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासमवेत भास्कर बैरीशेट्टी व शिवाई नगर, पवार नगर, येऊर, वसंत विहार येथील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.

सविस्तर वाचा

15:01 (IST) 11 Nov 2022
भंडारा : धक्कादायक! खोट्या कागदपत्रांच्या आधारे धान खरेदी केंद्रात ८ कोटी ५६ लाखांचा घोटाळा

तुमसर तालुक्यातील येरली येथील धान खरेदी केंद्रात खोटे दस्तऐवज सादर करून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. तब्बल ८ कोटी ५६ लाख ९४ हजारांचा भ्रष्टाचार  झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संस्थेच्या अध्यक्षांसह दहा जणांवर गुरुवारी सायंकाळी तुमसर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा

14:24 (IST) 11 Nov 2022
बारामती दौ-यावर आलेले केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेलांना वाहतूक कोंडीचा फटका

बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आलेले अन्न प्रक्रिया आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांना शुक्रवारी धायरी परिसरातील वाहतूक कोंडीचा फटका बसला. नऱ्हे येथील बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निघालेला केंद्रीय राज्यमंत्र्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला.

सविस्तर वाचा

14:13 (IST) 11 Nov 2022
यवतमाळ : चित्रा वाघ आणि पत्रकारांमध्ये खडाजंगी, संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारताच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष भडकल्या

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप करून आपण त्यांचे राजकीय जीवन उध्वस्त केले नाही काय, असा प्रश्न विचारताच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भडकल्या. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारास पत्रपरिषदेत का बोलावले?, यापुढे अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार परिषदेत आमंत्रित करायचे नाही, असा दम स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना दिला.

सविस्तर वाचा

14:05 (IST) 11 Nov 2022
नाशिक:अपघात प्रवण क्षेत्रात सिग्नलची मात्रा ,उपायांसाठी खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण

नाशिक महानगरपालिका शहरात बंद असलेले सात सिग्नल कार्यान्वित करण्यासह २२ ठिकाणी नवीन सिग्नल उभारणार आहे. यात प्रथम अपघातप्रवण क्षेत्रास प्राधान्य देऊन दुसऱ्या टप्प्यात गर्दीच्या ठिकाणी ती व्यवस्था केली जाईल.

सविस्तर वाचा

13:47 (IST) 11 Nov 2022
कल्याण मध्ये ज्येष्ठ नागरिकाची २४ लाखाची फसवणूक

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा भागात राहत असलेल्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला अर्धवेळ नोकरीचे आमीष दाखवून त्यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून चार भामट्यांनी २४ लाख ३० हजार रुपयांची रक्कम उकळून फसवणूक केली आहे.

सविस्तर वाचा

13:32 (IST) 11 Nov 2022
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी सट्टा घेणाऱ्या दोन सट्टेबाजांना अटक

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान झालेल्या सामन्यांवर संकेतस्थळाच्या माध्यमातून सट्टा घेणाऱ्या दोन सट्टेबाजांना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींकडून लॅपटॉप, मेमरी कार्ड, २१ मोबाइल जप्त करण्यात आले असून संकेतस्थळ मालकाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

सविस्तर वाचा

13:02 (IST) 11 Nov 2022
पुणे: ‘हर हर महादेव’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटांचे प्रदर्शन थांबवा; अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

‘हर हर महादेव’ आणि येत्या काही काही दिवसांत प्रदर्शित होणारा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांचे प्रदर्शन थांबविण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर यांनी गुरुवारी केली.

सविस्तर वाचा

12:22 (IST) 11 Nov 2022
राज्यात रोजगार मेळाव्यांच्या खर्च मर्यादेत वाढ

जिल्हा व विभागस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याच्या खर्च मर्यादेत घसघशीत वाढ करण्यात आली आहे. एकूण रक्कमेतून २० टक्के राशी मेळाव्याच्या प्रसिद्धीवर खर्च करण्याची अट घालण्यात आली आहे.

सविस्तर बातमी

12:21 (IST) 11 Nov 2022
अंधेरी गोखले पूल : पर्यायी रस्त्यांवरील फेरीवाले हटवण्याची मोहीम

धोकादायक बनलेला अंधेरीमधील गोखले पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे. या मार्गांवरील फेरीवाले हटवण्यासाठी सलग काही दिवस कारवाईची मोहीम हाती घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

सविस्तर वाचा

12:13 (IST) 11 Nov 2022
भंडाऱ्यात शनिवारी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी नागपूर मार्गे भंडाऱ्यात आगमन होणार आहे. भंडाऱ्यात दुपारी ३ वाजता त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भात होणारी ही त्यांची पहिली सभा असेल.

सविस्तर बातमी

12:00 (IST) 11 Nov 2022
मुंबई:जॉन्सनच्या बेबी टाल्कम पावडरचे आणखी नमुने तपासले का?

जॉन्सन बेबी टाल्कम पावडर या लोकप्रिय बालप्रसाधनाचे आणखी काही नमुने तपासले आहेत का, अशी विचारणा करून त्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.बेबी टाल्कम पावडर या उत्पादनात प्रमाणाबाहेर आलेले जिवाणू कमी करण्यासाठी कॅन्सरप्रवण अशी र्निजतुकीकरण प्रक्रिया केल्याच्या आरोपावरून सर्व प्रसाधनांचा उत्पादन परवाना रद्द केल्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) निर्णयाविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सविस्तर वाचा

11:59 (IST) 11 Nov 2022
मुंबईमध्ये गोवरची साथ,८४ रुग्णांची नोंद; गोवंडीमध्ये सर्वाधिक बाधित,पालिकेची सर्वेक्षण मोहीम

मुंबईमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांपासून गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले असून एकूण ८४ रुग्णांची नोंद झाली आहे. देवनार, गोवंडीचा भाग असलेल्या एम पूर्व विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

सविस्तर वाचा

11:00 (IST) 11 Nov 2022
मुंबई:व्यावसायिक जितेंद्र नवलानी विरोधातील गुन्ह्याचे प्रकरण;ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारात सहभाग नाही

हॉटेल व्यावसायिक जितेंद्र नवलानी विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांचा सहभाग दिसून येत नसल्याची भूमिका मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी उच्च न्यायालयात घेतली.

सविस्तर वाचा

10:45 (IST) 11 Nov 2022
नाशिक:मानधनापेक्षा खर्च अधिक;अंगणवाडी सेविकांचा मतदार याद्यांच्या कामास नकार

मतदार यादीशी संबंधित कामात वार्षिक सहा हजार रुपये मानधन मिळते. अन्य कामांची जबाबदारी सांभाळून ते करताना मानधनापेक्षा कित्येक पट जास्त पैसे इंधन व तत्सम बाबींवर खर्च करावे लागतात. घरोघरी फिरतानाचे वेगळेच अनुभव येतात. ऑनलाईन पध्दतीने हे काम जमत नाही.

सविस्तर वाचा

10:39 (IST) 11 Nov 2022
मुंबई: नवजात बालकांची विक्री करणाऱ्या दोन महिला अटकेत

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन महिलांना गुन्हे शाखा परिमंडळ ६ मधील अधिकाऱ्यांनी चेंबूरमधून अटक केली. अटक आरोपींमध्ये बाळाची माता आणि अन्य एका महिलेचा समावेश असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सविस्तर वाचा

10:14 (IST) 11 Nov 2022
“कोकण स्वर्गच पण…”, खराब रस्त्यांवरुन सुधा मूर्तींचं विधान, म्हणाल्या, “गुजरात, कर्नाटकमध्ये…”

‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि लेखिका सुधा मूर्तींनी नुकताच कोकण दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोकणाच्या नैसर्गिक सौदर्यांचं तोंडभरुन कौतुक केलं. कोकणाच्या दौऱ्यादरम्यान जाणवलेल्या समस्यांवरदेखील त्यांनी भाष्य केलं. “कोकण हा स्वर्ग आहे. मात्र, या स्वर्गात जाणारे रस्ते खराब आहेत”, असं मूर्ती यांनी म्हटलं आहे.

सविस्तर बातमी वाचा...

10:13 (IST) 11 Nov 2022
ब्रिटनमधून शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

सविस्तर बातमी वाचा...

10:11 (IST) 11 Nov 2022
Twitter Blue: ठरलं! व्हेरिफिकेशनची गरज नाही, कोणत्याही भारतीयाला मिळणार ‘ब्लू टीक’; पण द्यावं लागणार इतकं मासिक शुल्क

भारतात लवकरच ‘ट्विटर ब्लू’ सेवा सुरू होणार आहे. या सेवेसाठी दर महिन्याला ७१९ रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे. अमेरिका, इंग्लंडसह काही देशांमध्ये ट्विटरने ही सेवा सुरू केली आहे. ‘ट्विटर ब्लू’ सेवेमध्ये ‘व्हेरिफाईड बॅज’ मोफत उपलब्ध केले जाणार आहे.

सविस्तर बातमी वाचा...

मुंबई-गोवा महामार्गावर नदीपात्रात सापडलेली स्फोटके खोटी असल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे पेणकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.