डोंबिवली: येथील पूर्व भागातील ग प्रभाग हद्दीतील आयरेगाव सरस्वती शाळेच्या मागील बाजूस भूमाफियांनी उभारलेल्या बेकायदा चाळी, चाळींसाठी बांधलेले १४ जोते ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण नियंत्रण पथकाने मंगळवारी जमिनदोस्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याशिवाय म्हात्रेनगर मधील राजाजी रस्ता भागातील मढवी बंगल्याजवळ प्रवीण म्हात्रे, शिव यादव या भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभी केली आहे. या इमारतीत व्यापारी आणि निवासी असे दोन भाग आहेत. या बेकायदा इमारतीवर यापूर्वी दोन वेळा तोडण्याची कारवाई पालिकेकडून करण्यात आली होती.

हेही वाचा : कल्याण, ठाणे, मुंबईत १४ वर्ष घरफोड्या करणारा सराईत चोरटा कोळसेवाडी पोलिसांकडून अटक

आता पालिका अधिकारी निवडणूक कामात व्यस्त आहेत. हे पाहून भूमाफिया प्रवीण म्हात्रे यांंनी तोडलेल्या इमारतीचे बांंधकाम पुन्हा सुरू केले होते. ही माहिती समजताच साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांंनी पोलीस बंदोस्तात ही बेकायदा इमारत तोडण्याचे काम सुरू केले आहे. या इमारतीच्या चारही बाजला वाहन जाण्याची सुविधा नसल्याने कामगारांच्या साहाय्याने या इमारतीचे तोडकाम बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे.

आयरेगाव सरस्वती शाळेच्या मागे भूमाफियांनी बेकायदा चाळी आणि नवीन चाळींसाठी १४ हून अधिक जोते बांधले आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त कुमावत यांंनी मिळाली होती. याविषयी तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची खात्री केल्यावर ग प्रभागाच्या तोडकाम पथकाने जेसीबीच्या साहाय्याने बेकायदा चाळी आणि जोते साहाय्यक आयुक्त कुमावत यांंच्या उपस्थितीत जमीनदोस्त केले. यावेळी भूमाफिया घटनास्थळावरून पळून गेले होते.

हेही वाचा : कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त

राजाजी रस्ता मढवी बंगल्याजवळ प्रवीण म्हात्रे यांनी बांधलेल्या बेकायदा इमारतीवर यापूर्वी दोन वेळा तोडकामाची कारवाई करूनही त्यांनी पुन्हा बेकायदा इमारतीचे काम सुरू केले आहे, अशी माहिती मिळताच, तोडकाम पथकाने या बेकायदा इमारतीवर कामगारांच्या साहाय्याने तोडकामाची कारवाई सुरू केली आहे. या बेकायदा इमारतीला पालिकेच्या कोणत्याही परवानग्या भूमाफिया प्रवीण म्हात्रे यांनी घेतल्या नाहीत. पालिका आणि महसूल विभागाचा महसूल बुडवून प्रवीण यांनी बेकायदा इमारत उभारल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई पालिकेकडून केली जाणार आहे.

या इमारतीच्या बाजुला सामासिक अंतर सोडण्यात आलेले नाही. या इमारतीमुळे आजुबाजुच्या इमारतींचा पाणी पुरवठा, मलनिस्सारणावर परिणाम झाला होता. त्यामुळे ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करावी, अशा तक्रारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडे तक्रारदारांकडून प्राप्त झाल्या होत्या. आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून कुमावतयांनी ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईने मढवी बंगला परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा : ठाणे: दोन लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह दोघे ताब्यात

आयरेगाव हद्दीतील बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. मढवी बंंगल्याजवळ प्रवीण म्हात्रे यांनी उभारलेली सात माळ्याची बेकायदा इमारत भुईसपाट करण्याच्या कामास सुरूवात केली आहे. या इमारतीजवळ जाण्यास जेसीबी किंवा अन्य वाहन रस्ता नाही. कामगारांच्या साहाय्याने हे बांधकाम जमीनदोस्त केले जाईल. या भूमाफियावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli ayre gaon illegal chawl demolished action against 7 floor illegal building css
First published on: 25-04-2024 at 14:05 IST