बदलापूरः रायगड जिल्ह्यातील कर्जत, माथेरान येथे झालेल्या मुसळधार पावसाने उल्हास नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कल्याण तालुक्यातील रायते येथील कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखालीही ही पातळी वाढली आहे. त्यामुळे हा पूल बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारी पहाटेपासून रायगड जिल्ह्यात आणि ठाणे जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. परिणामी ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली उल्हास नदी दुथडी भरून वाहते आहे. कर्जत आणि माथेरान भागात गेल्या २४ तासात मोठा पाऊस झाला आहे.

माथेरानच्या डोंगररांगांमध्ये सुमारे १८१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी कर्जत, नेरळ, वांगणी असा प्रवास करत पुढे कल्याण तालुक्यात जाते. या कल्याण तालुक्यातील अनेक गावांना उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचा फटका बसतो. या भागात रायते येथे कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर महत्वाचा पूल आहे. या पुलावरून ठाणे, मुंबई ते अहिल्यानगर आणि आसपासच्या भागातील मोठी वाहतूक होत असते. या रायते येथील पुलाखाली उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्यास हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जातो.

२६ जुलै नाही, २६ मेलाच बदलापुरात उल्हास नदी इशारा पातळीवर; बदलापुरच्या भुयारी मार्गात कार बुडाली, वांगणी रस्ताही पाण्याखाली

सोमवारी संततधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे दुपारी एकच्या सुमारास कल्याण अहिल्यानगर मार्गावरील रायते पुलाची वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. याचा फटका स्थानिक नागरिकांसह लांब पल्ल्याच्या वाहनांना बसला. यात शेतमाल नेणारे, दूध टँकर यांचाही समावेश होता.

बदलापुरातील पुलही बंदउल्हास नदीची वाढलेली पाणी पातळी पाहता बदलापूर शहरातून बदलापूर गाव, सोनिवली, अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात जाण्यासाठी महत्वाचा असलेला पूलही बंद करण्यात आला. त्यामुळे सर्व वाहतूक वालिवली पुलावरून होत होती