Morgan Stanley : ठाणे – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे पर्यटनासह उद्योगांच्या वाढीसही चालना मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हा शहरातील वायू वितरण करणाऱ्या कंपनीसाठी दीर्घकालीन वाढीचा प्रमुख चालक ठरू शकतो. ज्यामुळे सुमारे चार अब्ज मैलांच्या प्रवासाची भर पडू शकते असे मत जागतिक वित्तीय सेवा देणाऱ्या मॉर्गन स्टॅनली कंपनीने व्यक्त केले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नवी मुंबईतील उलवे येथे आहे. जे दक्षिण मुंबईपासून सुमारे ३७ किमी अंतरावर याचे एकूण क्षेत्रफळ १,१६० हेक्टर (सुमारे २,८६६ एकर) इतके आहे. विमानतळे ही शहराच्या वाढीची केंद्र ठरत असतात. यामुळे नवी मुंबई परिसरात निवासी प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रे, लॉजिस्टिक पार्क, व्यावसायिक केंद्रे, हॉटेल्स आणि इतर सेवांची उभारणी होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळच्या ३ दशलक्ष टनांहून अधिक वार्षिक क्षमतेमुळे निर्यात-आयात वाढेल, लॉजिस्टिक अडथळे कमी होतील आणि पुरवठा साखळी अधिक सक्षम बनेल असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच मॉर्गन स्टॅनली या जागतिक वित्तीय सेवा कंपनीने जी गुंतवणूक बँकिंग, सिक्युरिटीज, संपत्ती व्यवस्थापन आणि गुंतवणूक व्यवस्थापन सेवा पुरवते या कंपनीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हा शहरातील वायू वितरण करणाऱ्या कंपनीसाठी दीर्घकालीन वाढीचा प्रमुख चालक ठरू शकतो असे मत व्यक्त केले आहे.
ब्रोकरेजनुसार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा शहरातील वायू वितरण करणाऱ्या या कंपनीसाठी दीर्घकालीन वाढीचा महत्त्वाचा घटक ठरू शकतो. विमानतळाभोवती नवीन रस्ते, नेटवर्क उभे राहिल्याने महानगर गॅस लिमिटेडचा एकूण संभाव्य बाजार (Total Addressable Market – TAM) पुढील दहा वर्षांत दुप्पट होऊ शकतो, असा अंदाज मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केला आहे.
अहवालानुसार, नैसर्गिक वायू हा केवळ संक्रमण इंधन म्हणून नव्हे तर, मुंबईच्या वाढत्या वाहतुकीसाठी मुख्य घटक ठरेल. विमानतळाच्या कामकाजात वाढ होत असताना महानगर गॅसच्या वायू वापराच्या वाढीचा दर दरवर्षी १०० बेसिस पॉइंट्सने वाढू शकतो. म्हणजेच FY25-35 दरम्यान ६% वरून ७% चक्रवाढ वार्षिक वृद्धीदर (CAGR) होण्याची शक्यता आहे.
नेमके शेअरर्स काय सांगतात ?
सोमवारी,१३ ऑक्टोबरला महानगर गॅस लिमिटेड (Mahanagar Gas Ltd – MGL) चे शेअर्स ०.९३% नी घसरून १,२८२.९० रूपयांवर व्यवहार करत होते, तरीही मॉर्गन स्टॅनलीने या शेअरवर आपले ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवले असून लक्ष्य किंमत १,७४९ रूपये निश्चित केली आहेत.
दुपारी १:०७ वाजता महानगरचा शेअर दिवसाच्या १,३०३.७० रूपयाच्या उच्चांक आणि १,२८२.१० रूपयाच्या नीचांक यामध्ये व्यवहार करत होता. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत महानगरच्या शेअरमध्ये ०.०६% वाढ झाली असली तरी, तो अजूनही त्याच्या ५२ आठवड्यांच्या १,८५७ रूपयाच्या उच्चांकापेक्षा खूपच खाली आहे.
Morgan Stanley : मॉर्गन स्टॅनली नेमके करते काय ?
मॉर्गन स्टॅनली ही जागतिक वित्तीय सेवा कंपनी आहे. जी गुंतवणूक बँकिंग, सिक्युरिटीज, संपत्ती व्यवस्थापन आणि गुंतवणूक व्यवस्थापन सेवा पुरवते. या कंपनीच्या मार्फत गुंतवणूक बँकिंग (Investment Banking), संपत्ती व्यवस्थापन (Wealth Management), गुंतवणूक व्यवस्थापन (Investment Management), सेल्स आणि ट्रेडिंग (Sales & Trading) तसेच संशोधन (Research) केले जाते.
महानगर गॅस लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य शहर वायू वितरण कंपन्यांपैकी एक आहे. जी मुख्यतः मुंबई महानगर प्रदेशात सिएनजी आणि पिएनजी पुरवते.