लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी वागळे इस्टेट भागात मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये चोरट्यांचा देखील सुळसुळाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या माजी नगरसेवक तसेच शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांचा साडे सहा लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये १२ आणि सहा तोळ्यांच्या सोनसाखळी, ५०-५० हजारांच्या रोकडचा देखील सामावेश आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून निवडणुक लढवित आहेत. सोमवारी त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीद्वारे शक्तीप्रदर्शन केले. शिंदे यांच्यासोबत मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते. शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला. या मिरवणुकींमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला होता.

आणखी वाचा-स्थानिक शिवसैनिक विरोधात, मात्र कथोरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण, शिवसैनिक भूमिका बदलणार का याकडे लक्ष

सोमवारी दुपारी १२ ते ३ वाजताच्या या कालावधीत माजी नगरसेवकासह काही पदाधिकाऱ्यांच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये १२ आणि सहा तोळ्यांच्या सोनसाखळ्या आणि ५०-५० हजार रुपयांच्या रोकडचा सामावेश आहे. यानंतर शिंदे गटाच्या या पदाधिकाऱ्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves in the chief minister eknath shindes procession mrj