ठाणे – देशाचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम् या गीताचे गायन, त्या गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शन तसेच कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये देखील आज, ७ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत देशाचे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी तयार करून त्यास ७ नोव्हेंबर, २०२५ रोजी ‘वंदे मातरम्’ १५० वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील शाळा, महाविद्यालयांमधून रोज वंदे मातरम् या गीताची काही कडवी गायिली जात असतात. मात्र, १५० वर्षपूर्तीचे औचित्याने ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीदरम्यान राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘संपूर्ण वंदे मातरम्’चे गायन व्हावे, तसेच ‘वंदे मातरम्’ या गीताचा इतिहास सांगणारे कार्यक्रम व्यवस्थापनाच्यावचीने आयोजित केले जावे, असे राज्यातील शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षण आयुक्तांना पत्र देत या सूचना दिल्या आहेत. त्यानिमित्त ठाण्यातील शाळांमध्ये देखील विविध कार्यक्रम होणार आहेत. या मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आज, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ५०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत समूह वंदे मातरम् गायन केले जाणार आहे.

तसेच दुपारी १ वाजताच्या सुमारास ‘वंदे मातरम – माहितीपर व्याख्यान’ या विषयावर कोकण प्रांत इतिहास संकलन समितीचे सचिव चंद्रकांत जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत. यास श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासचे सहकार्य असणार आहे. तसेच नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेत सकाळी ७ वाजता वंदे मातरम् गायन होणार आहे.

ठाण्यातील ए.के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ३१ ऑक्टोबर पासून ७ नोव्हेंबर या कालावधीत संपुर्ण वंदे मातरम् गीत गायले जात आहे.

१५० वर्षांपूर्वी ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी कार्तिक शुद्ध नवमीला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम या गीताची रचना संस्कृत आणि बंगाली भाषेत केली. दैनंदिन स्वरूपात वंदे मातरम मधील दोन कडवी गायली जातात. राष्ट्रगीताच्या १५० वर्षपुर्तीनिमित्त सर्व शाळा महाविद्यालयात संपुर्ण वंदे मातरम् गायले जात आहे.