Pune Viral Video : बारामती हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीने मागील काही वर्षांमध्ये भरपूर विकास केला आहे. बारामतीमध्ये अनेक सुख सविधा उपलब्ध आहेत. बारामतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भव्य इमारत दिसत आहे. इमारत पाहून कुणाला वाटेल हे एखादे एअरपोर्ट आहे. पण हे एअरपोर्ट नसून बारामती येथील बसस्थानक आहे. हे बसस्थानक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Baramati bus stop video this is not a airport this is bus stand at Baramati pune video goes viral)

बारामतीचे बसस्टॉप पाहिले का? (Baramati bus stop)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला बारामतीचे सुंदर आणि स्वच्छ असे बसस्थानक दाखवले आहेत. या बसस्थानकावर जाहिरातीसाठी टिव्ही स्क्रिन लावलेली दिसत आहे. सगळीकडे स्वच्छता, नामफलक आणि सुंदर परिसर दिसत आहे. हिरवेगार झाडांचे गार्डन दिसत आहे. बसस्थानकाचा परिसर खूप मोठा आहे. प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा : ‘या’ रेल्वेचे भाडे ऐकून नेटकरी संतापले, तिकिटाचे दर पाहून तुम्हालाही फुटेल घाम, रेल्वेच्या तिकिटाचा फोटो होतोय तुफान व्हायरल

या बसस्थानकावर सुंदर असे उपहारगृह सुद्धा आहे. त्याचबरोबर येथे विनावाहक सेवा, पास सुविधा, आरक्षण सुविधा, पोलीस मदत केंद्र सुद्धा आहे. या बसस्थानकावर चौकशी कक्ष, हिरकणी कक्ष, प्रतिक्षालय आणि पार्सल विभाग सुद्धा आहेत. याशिवाय पे अँड पार्क सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. हे बसस्थानक पाहून कोणीही थक्क होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : चिमुकल्याच्या जीवाशी खेळ कशाला? रेल्वेस्थानकावर सरकता जीना चढताना महिलांनी धोक्यात टाकला लेकराचा जीव, Video Viral

maze.pune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बारामती बस स्टॉप”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “उभा महाराष्ट्राचा विकास फक्त बारामतीतच झाला राव” तर एका युजरने लिहिलेय, “स्वारगेटचे हाल बघवत नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “जिथं लोकवस्ती कमी आहे तिथे बसस्टॉप आहे…जिथे रोड नको तिथे हायवे आहे जिथे विमान आहे तिथे एअरपोर्ट नाही आणि जिथे नदी आहे तिथे पाणी नाही…” एक युजर लिहितो, “विषय आहे का..”