Dancer Bites Off Live Hen’s Head Video Viral: आंध्र प्रदेशातील अनकापल्ले येथे एका डान्स कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. जी पाहून उपस्थित असलेले लोकही हादरले. स्टेजवर भरप्रेक्षकांसमोर एक डान्स ग्रुप नाचत होता. त्यावेळी एका डान्सरनं सर्वांसमोर जिवंत कोंबडीचं डोकं दातानं कापलं आणि रक्त पिण्यास सुरुवात केली. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आता संबंधित डान्सरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेक्षकांसमोर डान्सर तरुणाचे धक्कादायक कृत्य ( Dancer Bites Off Live Hens Head Video Viral)

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डान्सर तरुणांचा एक ग्रुप लाल साडी नेसून स्टेजवर नाचत आहे. या ग्रुपच्या अगदी सेंटरला एक डान्सर हातात जिवंत कोंबडी घेऊन नाचताना दिसत आहे. यावेळी हा डान्सर तरुण पुढच्याच क्षणी असं काही धक्कादायक कृत्य करतो की, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. डान्सर नाचता नाचता मधेच कोंबडीला दोन्ही हातांनी घट्ट पकडतो आणि तिचं डोकं दातांनी जोरात चावतो.

तरुणाने कोंबडीचे डोकं धडापासून केल वेगळं अन्…. ( Shocking video viral)

त्याचं हे रानटी कृत्य इथेच संपत नाही. तो पुढे कोंबडीचं डोकं धडापासून वेगळं केल्यानंतर तिचं रक्त पितो आणि तोंडातून हवेत फवारे मारू लागतो. या अत्यंत असंवेदनशील कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी त्यावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांनी डान्सरविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

More Stories On Viral Video : “ही मुंबईचं नाव खराब करतेय”, रेल्वेस्थानकावरील तरुणीचा विचित्र डान्स VIDEO पाहून युजर्सचा संताप; म्हणाले, “वेडेपणा…”

PETA इंडियाच्या माहितीनुसार, या धक्कादायक घटनेवर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी संबंधित डान्स ग्रुप आणि आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लोकांनी तक्रारीत म्हटलं की, संबंधित डान्सर ग्रुपनं जेव्हा प्रेक्षकांसमोर हे रानटी कृत्य केलं, त्यावेळी तिथे लहान मुलंही उपस्थित होती. त्यांच्या मनावर याचा काय परिणाम झाला असेल? या प्रकरणी आता संबंधित डान्स ग्रुप आणि आयोजकांविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) १८६० च्या कलम ४२९ व ३४ आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११ (१) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dancer bites off live hens head during performance in anakapalli andhra prasesh case filed after video viral sjr