Fact Check Of Viral Photo : बॉलीवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या ‘छावा’ या नवीन चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आणणारा अनुभव दिला, असे म्हणायला हरकत नाही. तसेच सोशल मीडियावरही नेटकऱ्यांकडून फोटो आणि व्हिडीओमार्फत विकी कौशलच्या अभिनयाचे कौतुक केले जाते आहे. तसेच काही चाहते चित्रपट बघायला घोड्यावर बसून येत आहेत, तर काही भक्तीचे प्रतीक म्हणून पोस्टरला दुधाचा अभिषेक करत आहेत. तर या सगळ्यात लाईटहाऊस जर्नलिझमला ऑनलाइन शेअर केलेला एक फोटो सापडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल फोटोमध्ये काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ‘छावा’ चित्रपटाचा निषेध करत असल्याचे दाखवले आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा फोटो २०१३ चा आहे.

तर नक्की काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर प्रशांत शेंबेकरने व्हायरल दाव्यासह फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये काही मंडळी भल्यामोठ्या पोस्टरसमोर बसली आहेत. तसेच “छावा चित्रपटावर बंदी घाला आणि औरंगजेब संत होता असे सांगत उपोषण करणाऱ्या एनसीपीचा निषेध” अशी कॅप्शन फोटोला दिली आहे.

इतर युजर्सदेखील हाच फोटो शेअर करत आहेत…

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid0q hh2oGXaAhMedZreWi2bSbBVPXEmdaenqQnR8icjCQmKy8rjWWisBn25Dsek3uPJl&id=100087900994008

तपास:

तर मोठ्या प्रमाणात शेअर होणाऱ्या या फोटोवर आम्ही रिव्हर्स इमेज करून आमचा तपास सुरू केला.

आम्हाला bharatuntoldstory.wordpress.com या ब्लॉगवर पोस्ट केलेला एक फोटो सापडला.

https://bharatuntoldstory.wordpress.com/tag/vote-bank

तर फोटोच्या खाली लिहिलेल्या मजकुरात असे म्हटले आहे की, आगामी बॉलीवूड चित्रपट ‘औरंगजेब’च्या शीर्षकाविरुद्ध महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (तेव्हाचे औरंगाबाद) येथे भारतीय मुस्लिमांचा एक गट निषेध करत होता. हा ब्लॉग जुलै २०१३ मध्ये अपडेट करण्यात आला होता.

एक्स युजर तारेक फतह यांनीही ८ मे २०१३ रोजी त्यांच्या प्रोफाइलवर हा फोटो शेअर केला होता.

निष्कर्ष: तर २०१३ मध्ये ‘औरंगजेब’ या बॉलीवूड चित्रपटाविरुद्ध निषेध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा फोटो दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह शेअर केला जात आहे. पण, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे, हे आमच्या तपासातून सिद्ध झाले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check of ncp workers viral photo protest against vicky kaushal chhaava movie but this image is old read what truth is asp