Weird Fashion Viral Video : अतरंगी स्टाईल आणि अनोख्या फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते. तिच्या अनोख्या स्टाईलमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत असतात. अनेकदा उर्फीच्या हटके स्टाईलचे लोक खूप कौतुक करतात, तर काही जण तिला प्रचंड ट्रोल करतात. कौतुकापेक्षा उर्फी अनेकदा ट्रोलिंगची शिकार होते. मात्र, त्यानंतरही उर्फीने तिच्या हटके स्टाईल आणि फॅशनमध्ये कोणताही बदल केला नाही. सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील त्याची अतरंगी फॅशन अन् स्टाईल पाहून तुम्हीही म्हणाल, अरे ह्याच्यासमोर तर उर्फी जावेदसुद्धा फेल आहे. याहून अधिक अतरंगी फॅशनसह त्याचा कॉन्फिडन्स उतका जबरदस्त आहे की पाहून उर्फीला धक्का बसेल.
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता, तरुणाने उर्फीच्या कपड्यांना टफफाईट देईल असा हटके शर्ट परिधान केलाय, त्याने चार वेगवेगळ्या शर्टचा वापर करून एक विचित्र शर्ट शिवलाय, विशेष म्हणजे या शर्टला तीन कॉलर आहेत, एक आपल्या नार्मल शर्टला असते तशी आणि दोन कॉलर त्याने दोन खांद्यावर शिवल्या आहेत. मधल्या भागात जांभळ्या रंगाचे शर्ट दिसतेय, उजव्या बाजूचा हाताचा भाग ब्लॅक अँड व्हाईट आणि डाव्या बाजूला हात व्हाईट आणि ब्लू रंगाच्या शर्टपासून बनवला आहे, अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या रंगांच्या शर्टला कापून त्याने हा अतरंगी शर्ट शिवलाय. याहून अतरंगी भाग म्हणजे त्याने बटणांच्या जागी चक्क दरवाजाच्या छोट्या कड्या लावल्या आहेत. फॅशनचा हा कोणता प्रकार आहे माहीत नाही, पण पठ्ठ्याने उर्फीलासुद्धा टक्कर दिली हे मात्र खरं आहे.
यात कहर म्हणजे असा अतरंगी शर्ट भाईसाहेब गर्दीच्या ठिकाणी न लाजता घालून फिरतोय. काही जण त्याच्याकडे पाहात आहेत, काही हसत आहेत, काही मोबाईलवर व्हिडीओ बनवत आहेत, परंतु त्याच्या चेहऱ्यावरील भाव असे आहेत की जणू तो म्हणत आहे की “ही तर फक्त सुरुवात आहे, मी कोणत्या प्रकारची पँट घातली आहे ते तर तुम्ही पाहिलेच नाही.”
उर्फीचा भाऊ कुल्फी, युजर्सच्या भन्नाट कमेंट्स
हा व्हिडीओ Naughty Foofaji नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे; तर अनेकांनी व्हिडीओला लाईकही केले आहे. तर अनेक जण त्यावर भन्नाट कमेंट्स करत आहेत. एका युजरनने लिहिले की, भाऊ नाश्त्यात १० उर्फी खाऊ शकतो. दुसऱ्याने लिहिले… हा उर्फीचा भाऊ कुल्फीसारखा दिसतो. तर तिसऱ्याने लिहिले की, हे पाहिल्यानंतर उर्फीदेखील कोपऱ्यात उभी राहून रडू लागेल.
