Mumbai Local Viral Video : मुंबईच्या धावपळीत सर्वसामान्यांचा आधार असते ती म्हणजे मुंबई लोकल ट्रेन, रोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. लोकलच्या गर्दीत उभं राहून आपलं ऑफिस, कॉलेज आणि कामाचे ठिकाण गाठतात. याच मुंबई लोकलमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडयावर व्हायरल होत असतात. यात कधी महिलांची सीटसाठी झालेली जबरदस्त हाणामारी, तर कधी विचित्र डान्स, तर कधी जीवघेण्या गर्दीच्या व्हिडीओंचा समावेश आहे. पण, आता मुंबई लोकल ट्रेनमधील असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. कारण एक तरुण लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभं राहून असं काही करतोय की ते पाहून तुम्हीच बोलाल की, आता याला का बोलायचे?

लोकल ट्रेनमध्ये प्रवासी सुकतोय अंतर्वस्त्र (Mumbai Local Viral Video)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लोकल ट्रेन प्रवाशांच्या प्रचंड गर्दीने भरलेली दिसत आहे. या धावत्या मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभं राहून एक प्रवासी आरामात प्रवास करतोय. यावेळी त्याच्या हातात रुमालासारखे काही तरी काळ्या रंगाचे कापड दिसतेय, जो ते वाऱ्यावर सुकवतोय असे वाटतेय. पण, व्हिडीओमध्ये एकदम निरखून पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल की, तो काही कापड वैगरे नाही तर चक्क अंतर्वस्त्र वाऱ्यावर सुकवतोय. ही व्यक्ती लोकल ट्रेन सुरू होताच दरवाजावर उभं राहून चक्क अंतर्वस्त्र सुकवण्याचा प्रयत्न करतेय. हे दृश्य पाहून एका व्यक्तीने त्याचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे. लोकल ट्रेनमधील असे दृश्य तुम्हीही आजवर कधीही पाहिले नसेल. पण हा व्हिडीओ नेमका कुठल्या रेल्वेस्थानकादरम्यानचा आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

मुंबई लोकल ट्रेनमधील व्यक्तीचा विचित्र कृतीचा हा व्हिडीओ @aamchi_mumbai’s नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर अनेकांनी भन्नाट कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

Read More Trending News : ईssss…! मद्यधुंद तरुण रस्त्यातील चिखलात लोळला अन् नंतर केले असे काही की, video पाहून तुम्हालाही येईल किळस

“मुंबई लोकल अनेक मुंबईकरांचे दुसरे घरं” युजर्सच्या भन्नाट कमेंट्स (Mumbai Local Train Viral Video )

एका युजरने कमेंट्समध्ये लिहिले की, मुंबई लोकल ही फक्त ट्रेन नाही तर अनेक मुंबईकरांचे दुसरे घरं आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, तिथे वादळात लोकांची घरं उद्ध्वस्त होत आहे आणि इथे आपण अंतर्वस्त्र सुकवतोय. यात अनेकांनी हसण्याची इमोजी शेअर केल्या आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी असे म्हटले की, लोकल ट्रेनमध्ये आता हेच बघायचे बाकी होते.