सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडीओ मजेशीर तर काही फारच धक्कादायक असतात. यात काही व्हिडीओतून अशाकाही गोष्टी समोर येतात ज्यावर विश्वास ठेवणे अवघड असते. नुकताच असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका महिलेने तिच्या शरीरात दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आत्मा शिरल्याचा दावा केला आहे. जो आता न्याय मागायला आल्याचे ती म्हणत आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरीरात सुशांत सिंह राजपूतचा आत्मा शिरल्याचा महिलेचा दावा

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला रस्त्यावर बसू जोरजोरात ओरडत असल्याचे दिसत आहे. तिचा तो रागावलेला आक्रमक चेहरा पाहून कोणीही घाबरेल. मात्र एक महिला पत्रकार तिच्याजवळ पोहोचते आणि तिला काही प्रश्न विचारते. यावेळी ती महिला स्वत: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत असल्याचे सांगितले. यावेळी रागात असलेली ही महिला हा देह आपल्या आईचा असल्याचा दावा करते. ती महिला पुढे म्हणते की, ‘हे माझ्या आईचे शरीर आहे आणि मी माझ्या आईच्या शरीरात जन्म घेतला आहे. आणि माझ्या शरीरात सुशांत सिंग राजपूतचा आत्म जिवंक आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

महिलेने पुढे सांगितले की, त्याची हत्या करण्यात आली आहे, यासाठी त्याच्या गळ्यात इंजेक्शन देण्यात आले होते. त्यावर पत्रकाराने प्रश्न विचारला की, त्याला इंजेक्शन देऊन कोणी मारले? यावर महिलेने मला काहीच माहीत नसल्याचे सांगितले आणि पुढे तुम्ही लोकांनी मारले असे रागात म्हणाली. या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. अशाच एका यूजरने लिहिले की, सुशांतमध्ये पत्रकाराचा आत्मा शिरला आहे. तर आणखी एका यूजरने लिहिले की, ‘व्वा, काय अभिनय करतेय.

स्वत:ला सुशांत सिंह राजपूत म्हणवणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ @NarundarM नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ असून यातील कोणतेही गोष्टींची, दाव्यांच्या सत्यतेची लोकसत्ता डॉट कॉम पुष्टी करत नाही.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला होता. त्याच्या मृत्यूमागचे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले, दिवंगत अभिनेता गेल्या अनेक महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनेकांची चौकशी आणि तपास केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajputs soul entered womans body says im born again shocking video viral sjr