Mumbai Local Shocking Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. यात महिलांच्या डब्यातही रोजच्या रोज भांडण पाहायला मिळतात. पण अनेकदा महिलांना लेडिज डब्यातदेखील सुरक्षित वाटत नाही. अनेकदा काही पुरुष मुजोरी करत महिलांच्या डब्यात चढतात आणि त्यांना त्रास देतात. सध्या अशीच एक घटना घडलीय. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…

व्हायरल व्हिडीओ (Ladies Coach Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक मद्यधुंद अवस्थेत असणारा तरुण मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात चढला आणि अश्लील वर्तन करू लागला. एका महिलेने त्या तरुणाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओमध्ये महिला बोलताना दिसतेय…

हॅलो मी मनाली, आज मी ठाणे ते कल्याण दरम्यान प्रवास करत होती. मी लेडिज फर्स्ट क्लासमध्ये होती तर हा मुलगा पहिला या डब्यात आला तर आम्ही सांगितलं की हा लेडीज डबा आहे इथे पुरुषांना येण्याची परवानगी नाही. तर तो बाजूच्या डब्यात गेला आणि तिथून आमच्याकडे बघून काहीतरी घाणेर्ड घाणेर्ड बोलत होता. डोळा वगैरे मारत होता आणि अश्लील चाळे करत होता. हे बघून मी खूप शॉक झाले. पण मग मी म्हटलं की याला असंच नाही सोडायचं, मग मी कॅमेरा चालू केला आणि व्हिडीओ रेकॉर्ड करायला सुरूवात केली. आणि त्याला म्हणाले जर हिंमत असेल तर आता जे करत होतास ते परत कर.

मी आरडाओरडा केल्यानंतर त्या डब्यात असणाऱ्या दोन माणसांनी त्याला उतरायला सांगितलं तर तो त्यांच्याशीदेखील भांडत होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो ट्रेनमध्ये कसलेतरी नशा करत होता. त्याच्या हातात सफेद रंगाचं काहीतरी होतं आणि तो त्याचा वास घेत होता.

दिवसाढवळ्या प्रवास करणं एवढं धोकादायक झालंय. आज ते दोन दादा होते म्हणून आम्ही वाचलो. त्या दोघांनी पुढच्या मुंब्रा स्टेशनला त्याला उतरवलं. त्याला उतरवल्यानंतर तो पुन्हा आमच्या डब्यात चढत होता. आमच्याकडे बघून काहीतरी बोलत होता आणि शिव्या देत होता. हे सगळं पाहून त्या दोन दादांनी त्याला ढकललं आणि ट्रेन सुरू झाली त्यामुळे तो पुन्हा आमच्या डब्यात काही चढू शकला नाही. पण खरंच दिवसाढवळ्या ट्रेनमधून प्रवास करणं कठीण झालं आहे.,

लाडकी बहिण योजना राबवताय पण आपली जी लाडकी बहिण आहे ती सुरक्षित आहे का? आज आपल्याइथले कायदे कडक नसल्यामुळे अशा मुलांची हिंमत जास्तीत जास्त वाढत जाते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @aaple_badlapur1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १९.२ मिलियन व्ह्युज आले आहेत. तसंच “१४ जून रोजी चुनाभट्टी स्थानकावर एका मद्यधुंद पुरूषाने लोकल ट्रेनच्या महिला डब्यात प्रवेश केला आणि प्रवाशांसमोर त्याची पँट काढण्याचा प्रयत्न केला.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “इतक्या महिला ट्रेनमध्ये असताना फक्त ती एकटीच त्याच्याविरोधात उभी राहिली… एका रीलने खूप काही शिकवलं” तर दुसऱ्याने “अशांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला पाहिजे” अशी कमेंट केली.