how anushkas chakda xpress co star anshul reacted on meeting virat kohli spg 93 | अनुष्का शर्माची सहकलाकार विराट कोहलीला भेटताच भावुक, म्हणाली, "माझा विश्वास बसत नाही..." | Loksatta

अनुष्का शर्माची सहकलाकार विराट कोहलीला भेटताच भावुक, म्हणाली, “माझा विश्वास बसत नाही…”

अनुष्काने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका पार्टीचे आयोजन केले होते.

अनुष्का शर्माची सहकलाकार विराट कोहलीला भेटताच भावुक, म्हणाली, “माझा विश्वास बसत नाही…”
bollywood and cricket

काही दिवसांपूर्वी तापसी पन्नूचा महिला क्रिकेटपटूच्या आयुष्यावरती एक चित्रपट आला होता. या चित्रपटाचे नाव होते ‘शाबाश मिठू’ हा चित्रपट एवढा खास चालला नसला तरी एकंदरच क्रिकेटपटूंच्या चरित्रपटात प्रेक्षकांना प्रचंड रस असतो. आता अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील याच धाटणीचा ‘चकडा एक्सप्रेस’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. अनुष्का शर्मा ‘झूलन गोस्वामी’ या महिला क्रिकेटपटूच्या चरित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनुष्का या चित्रपटासाठी चांगलीच मेहनत घेत आहे. मध्यंतरी तिने यासाठी तयारी करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. या चित्रपटाचं सध्या लंडन येथे चित्रीकरण सुरु आहे.

अनुष्काने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका पार्टीचे आयोजन केले होते. ज्यात तिचा नवरा आणि तिची सह कलाकार तिचा नवरा असे चौघेजण होते या चित्रपटातील तिची सहकलाकार अंशुल चौहानने विराट कोहलीसोबत फोटो व्हिडिओ काढून आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. पोस्टमध्ये ती कोहलीच्या शेजारी उभी असताना खूप आनंदी दिसत आहे. विराटने काळ्या पँटसोबत राखाडी रंगाचा टी-शर्ट घातला होता. अंशुलने पांढऱ्या पँटसह निळ्या रंगाचे जॅकेट आणि काळी टोपी घातली होती. तिने पोस्टला कॅप्शन दिला आहे की, “चाहत्याच्या आयुष्यातील क्षण !! माझा वाढदिवस आहे आणि माझा विश्वास बसत नाही की मी विराट कोहलीला पाहिले आणि भेटले. इथल्या चित्रांप्रमाणे अजूनही हसणे थांबवू शकत नाही. या क्षणासाठी धन्यवाद @anushkasharma. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा,” अशा शब्दात तिने आपल्या भवन व्यक्त केल्या आहेत.

अंशुलने ‘झिरो’, ‘बिच्छू खा खेल’, ‘ताजमहाल’ आणि ‘शुभ मंगल सावधान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती आता ‘चकडा एक्सप्रेसमध्ये’ दिसणार आहे, ज्यात अनुष्का मुख्य भूमिकेत आहे. ANI कडून मिळालेल्या माहितीनुसार अनुष्काचा भाऊ कर्णेश शर्मा त्याची होम प्रोडक्शन कंपनी क्लीन स्लेट फिल्मझसोबत ‘चकडा एक्सप्रेस’ची निर्मिती करणार आहे.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जीओ, व्हीआय, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपन्या ऑफर करणार ३० दिवसांचा प्लॅन; ट्रायने जारी केली यादी

संबंधित बातम्या

“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
“सतत एकेरी उल्लेख करतोय कारण…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षे यांचं ट्वीट चर्चेत
“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण
“वहिनी काय बॅटिंग….” ऋतुराज गायकवाडच्या खेळीनंतर सायली संजीवच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
विक्रम गोखलेंच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रतिक्रिया म्हणाले, “अभिनयाची संस्था…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे शहरात रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल; मागणी पूर्ण होईपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा निर्धार
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बहिणीला तेलंगणात अटक, गाड्यांचीही जाळपोळ; काय आहे प्रकरण?
निधीअभावी पुणे जिल्हा परिषदेच्या अत्याधुनिक अभिलेख कक्षाचे काम रखडले
Fifa World Cup 2022: मेस्सी-रोनाल्डोचे संघ होणार बाहेर? विश्वचषकाचे फसले गणित, जाणून घ्या समीकरण
यामी गौतमचा ‘लॉस्ट’ हा थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित