भाईंदर :-येत्या गणेशोत्सवापूर्वी मिरा भाईंदर शहराला  सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प योजनेतून ४० दशलक्ष लीटर पाणी दिले जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले आहे. मंगळवारी  ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के  यांच्या प्रचारासाठी ते मिरारोड येथे उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे लोकसभा जागेवर महायुतीतर्फे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के निवडणूक लढत आहे.त्यामुळे मिरा भाईंदर भाजप कार्यकर्ते व समर्थकांमध्ये पसरलेली नाराजी दूर करण्यासाठी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिर सभेचे आयोजन माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केले आहे. याप्रसंगी आमदार  प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन,खासदार प्रतापराव पाटील -चिखलीकर,माजी आमदार रविंद्र फाटक,पीपीआई पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे उपस्थितीत होते.

हेही वाचा >>> उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची नालासोपार्‍यात सभा, इंडिया आघाडीवर टीका

गेल्या काही वर्षात मिरा भाईंदर शहरात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर रित्या जाणवू लागला आहे.यावर उपाय म्हणून पालघरच्या सूर्या पाणी पुरवठा प्रकल्प योजनेतून मिरा भाईंदरसाठी राज्य शासनाने २१८ दश लक्ष लीटर पाणी मंजुर केले आहे.त्यानुसार मागील चार वर्षापासून या प्रकल्प योजनेच्या जलवाहिन्या अंथरण्याचे काम केले जात आहे.मात्र विविध कारणामुळे हा पाणी पुरवठा लांबणीवर जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शहराला एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या  २१५ दशलक्ष लीटर पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.

हेही वाचा >>> देश शरिया कायद्यावर चालू देणार नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कॉंग्रेसवर घणाघात

दरम्यान मंगळवारी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मिरा रोड येथे आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या गणेशोत्सवपूर्वी पहिला टप्पात  ४० दशलक्ष लीटर पाणी  राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तर मतदारांना लोभ दाखवून  फडणवीस यांनी राजकीय खेळी खेळल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

ठाण्याचे इंजिन मोदींला जोडले जाणार

‘देशात मोदींच्या पुढाकाराने महायुतीची विकासाची ट्रेन धावत आहेत.याचे इंजिन मोदीच आहेत.त्यामुळे यात सामान्य नागरिकांना बसण्याची संधी आहे.मात्र विरोधकांचे इंजिन हे  एकटे धावत आहेत.त्यात त्यांच्या  कौटुंबिक लोकांनाच बसण्याची संधी असणार आहे.त्यामुळे जागरूक जनतेने नरेश म्हस्के यांना धनुष्यबाणावर मतदान करून  विजयी करावे. जेणेकरून ठाण्याचे हे  इंजिन थेट मोदींना जोडले जाईल, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महिलांचे राज्य येणार

कुटुंब असो किंवा देश त्यांची जबाबदारी महिलांच्या हाती असल्यास तिथे विकास नक्कीच होतो.म्हणून नरेंद्र मोदींकडून  आगमी दिवसात विधानसभा व लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी ३३  टक्के जागा आरक्षित  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे देशाच्या विकासात मोठी भर पडणार आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीची कौरवांशी तुलना

देशात इंडिया आघाडीचे गटबंधन हे कौरवांच्या सेने प्रमाणे आहे.तर महायुतीचे गटबंधन हे पांडवांप्रमाणे आहे.ज्याचे नेतृत्व नरेंद्र मोदी करत असून त्यांच्या हातात देखील श्री रामा प्रमाणे धनुष्यबाण आहे. त्यामुळे आगमी निवडणुकीत  नागरिकांनी धनुष्यबाणावर मतदान करून देश सुरक्षित हातात द्यावा असे फडणवीस म्हणाले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 million liter water to mira bhayandar before ganesh festival promise by dcm devendra fadnavis in election campaign zws